IPL Auction 2025 Live

मुंबई इंडियन्स की चेन्नई सुपर किंग्स? अंबाती रायुडू याने निवडली आवडती IPL फ्रॅन्चायसी

त्याने फ्रँचायझीसह लाइव्ह सत्रादरम्यान विविध प्रश्नांची उत्तरे दिली. आयपीएलमध्ये रायुडूने आपली आवडती फ्रँचायझी निवडली. रायुडूने लीगमधील आपला आवडता संघ - चेन्नई सुपर किंग्ज या त्याच्या सध्याच्या संघाची निवड केली. रायुडू आजवर आईपीएलमधे मुंबई इंडियंस आणि चेन्नई सुपर किंग्स टीमकडून खेळला आहे.

अंबाती रायडू (Photo Credit: Getty)

इंडियन प्रिमीअर लीग (Indian Premier League) 2020 अनिश्चित काळासाठी स्थगित केल्यामुळे अनेक फ्रॅन्चायझी त्यांच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी ट्विटर आणि इंस्टाग्रामवर आपल्या स्टार्सची मुलाखत घेत आहेत. अलीकडेच, चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि अंबाती रायुडू (Ambati Rayudu) यांच्यात लाइव इन्स्टाग्राम सत्र पार पडले. त्याने फ्रँचायझीसह लाइव्ह सत्रादरम्यान विविध प्रश्नांची उत्तरे दिली. आयपीएलमध्ये रायुडूने आपली आवडती फ्रँचायझी निवडली. रायुडू आजवर आईपीएलमधे मुंबई इंडियंस (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स टीमकडून खेळला आहे. या दोन्ही टीममधील रायुडूने लीगमधील आपला आवडता संघ - चेन्नई सुपर किंग्ज या त्याच्या सध्याच्या संघाची निवड केली. सीएसकेच्या प्रचंड भावनिक आणि निष्ठावंत चाहत्यांचेही त्याने कौतुकही केले. या शिवाय, रायुडूने रोहित शर्माचेही कौतुक केले. रोहित आयपीएलच्या (IPL) इतिहासातील आजवरचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने चार वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहेत. (अंबाती रायुडू याला टीम इंडियाच्या विश्वचषक टीममधून वगळण्यावर निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी केला खुलासा)

रोहित आणि महेंद्र सिंह धोनी याचा कर्णधारपदाच्या फरकाविषयी बोलताना रायुडू म्हणाला, "महेंद्र सिंह धोनी आपल्या सर्वांचा कर्णधार आहे, त्यामुळे धोनीकडून कर्णधारपद शिकून रोहित कर्णधार झाला आहे. रोहितने त्याच्याकडून बरेच काही शिकले आहे. दोघांमध्ये फारसा फरक नाही, मला वाटते की ते योग्य दिशेने जात आहेत." तो म्हणाला, "या मुंबईच्या क्रिकेटपटूला धोनीच्या पातळीवर जाण्यासाठी अजून खूप पल्ला गाठायचा आहे, पण तो खात्री करुन घेईल असा मला विश्वास आहे." यापूर्वी गौतम गंभीर म्हणाला होता की, रोहित आज जिथे आहे त्याचे कारण धोनी आहे.

आपला माजी आयपीएल संघ, मुंबई इंडियन्स आणि सध्याची संघ चेन्नई सुपर किंग्जमधील फरकही त्याने स्पष्ट केला. रायुडू म्हणाला की, सीएसकेने त्यांच्या खेळाडूंवर दाखवलेल्या विश्वासाने तो प्रभावित झाला आहे. “सीएसकेमध्ये सर्व खूप शांत आहे, खेळाडूंच्या क्षमतेवर त्यांचा जास्त विश्वास आहे, मुंबईमध्ये अधिक ‘प्ले-यू-रोल’ प्रकारची व्यवस्था आहे, ”असे रायुडूने स्पष्ट केले. मुंबईने जिंकलेल्या तीन आयपीएल विजेतेपदाच्या रायुडू भाग होता. 2018 मध्ये चेन्नई सुपर किंग्जमध्ये जाण्यापूर्वी रायुडू आठ वर्षांपासून मुंबई फ्रँचायझीशी संबंधित होता. रायडूने 147 आयपीएल सामन्यांमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध एकमेव शतकासह 3300 धावा केल्या आहेत.