MI W vs UP W WPL 2025 Live Streaming: आज मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स आमनेसामने, जाणून घ्या कुठे पाहणार लाईव्ह टेलिकास्ट
दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. मुंबई इंडियन्सचा हा चौथा सामना असेल. मुंबई इंडियन्स महिला संघाने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 2 मध्ये विजय आणि 1 मध्ये पराभव पत्कारावा लागला आहे.
Mumbai Indians Women (WPL) vs UP Warriorz Women (WPL) 11th Match, WPL 2025 Live Streaming: महिला प्रीमियर लीगचा 11 वा सामना आज म्हणजेच 26फेब्रुवारी रोजी मुंबई इंडियन्स महिला आणि यूपी वॉरियर्स (MI vs UP) महिला यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना बेंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाईल. मुंबई इंडियन्सचा हा चौथा सामना असेल. मुंबई इंडियन्स महिला संघाने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 2 मध्ये विजय आणि 1 मध्ये पराभव पत्कारावा लागला आहे. मुंबई 4 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हरमन प्रीत कौरकडे आहे.
दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळू शकतो रोमांचक सामना
दुसरीकडे, यूपी वॉरियर्स महिलांनीही आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांना दोन्हीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आणि दोनमध्ये विजय मिळाला. यूपी वॉरियर्सची कमान दीप्ती शर्माकडे असेल. दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो. (हे देखील वाचा: Champions Trophy 2025 : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमधील मॅच रद्द झाल्याने चॅम्पियन्स ट्रॉफीच गणित बदललं? सेमीफायनलची लढत आणखी रंजक होणार)
किती वाजता सुरु होणार सामना?
महिला प्रीमियर लीग 2025 चा 11 वा सामना मुंबई इंडियन्स महिला आणि यूपी वॉरियर्स महिला यांच्यात बुधवार, 26 फेब्रुवारी रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू येथे खेळला जाईल. तर टॉसची वेळ त्यापूर्वी अर्धा तास असेल.
कुठे पाहणार सामना?
मुंबई इंडियन्स महिला आणि यूपी वॉरियर्स महिला यांच्यातील महिला प्रीमियर लीग 2025 चा 11 वा सामना भारतातील स्टार स्पोर्ट्स आणि स्पोर्ट्स 18 वाहिन्यांवर थेट प्रक्षेपित केला जाईल. याशिवाय, तुम्ही जिओ हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकता.
मुंबई इंडियन्स महिला संघ: यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हेली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, अमनजोत कौर, सजीवन सजना, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, पारुनिका सिसोदिया, क्लो ट्रायॉन, नदीन डी क्लार्क, कीर्तन बालकृष्णन, साईका इशाक, जिंतीमणी कलिता, अमनदीप कौर, अक्षिता माहेश्वरी.
यूपी वॉरियर्स महिला संघ: किरण नवगिरे, वृंदा दिनेश, दीप्ती शर्मा (कर्णधार), ताहलिया मॅकग्रा, श्वेता सहरावत, ग्रेस हॅरिस, उमा छेत्री (विकेटकीपर), चिनेल हेन्री, सोफी एक्लेस्टोन, साईमा ठाकोर, क्रांती गौर, गौहर सुलताना, चामारी अथापथू, राजेश्वरी गायकवाड, अलाना किंग, अंजली सरवानी, आरुषी गोयल, पूनम खेमनार.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)