
Gujarat Titans vs Mumbai Indians, Eliminator, IPL 2025 Match: टाटा आयपीएल 2025 मध्ये आज गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात एलिमिनेटर सामना मुल्लानपूर, चंदीगड येथील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे खेळवला जात आहे. हा सामना जिंकणारा संघ क्वालिफायर-2 मध्ये पंजाबसोबत खेळेल तर पराभूत संघ स्पर्धेतून बाहेर पडेल. लीग टप्प्यानंतर, गुजरात टायटन्स तिसऱ्या आणि मुंबई इंडियन्स चौथ्या स्थानावर राहिला. या हंगामात, गुजरात टायटन्सचे नेतृत्व शुभमन गिलकडे आहे. तर, मुंबई इंडियन्सची कमान हार्दिक पंड्याच्या खांद्यावर आहे. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत गुजरातसमोर 229 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
रोहित शर्माने 81 धावांची शानदार खेळी
नाणेफेक जिंकल्यानंतर, मुंबई इंडियन्स संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला आणि त्यांची सुरुवात चांगली झाली आणि दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 84 धावा केल्या. मुंबई इंडियन्स संघाने निर्धारित 20 षटकांत पाच विकेट गमावून 228 धावा केल्या. मुंबई इंडियन्सकडून सलामीवीर रोहित शर्माने 81 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान रोहित शर्माने 50 चेंडूंत नऊ चौकार आणि चार षटकार मारले. रोहित शर्मा व्यतिरिक्त, जॉनी बेअरस्टोने 44 धावा केल्या.
Ro-𝙎𝙪𝙥𝙚𝙧𝙝𝙞𝙩 Show 🍿
Delivered on the big occasion with a magnificent 81(50) 👌
Updates ▶ https://t.co/R4RTzjQfph #TATAIPL | #GTvMI | #Eliminator | #TheLastMile | @ImRo45 pic.twitter.com/eUrNCppezI
— IndianPremierLeague (@IPL) May 30, 2025
गुजरातच्या गोलंदाजांची धुलाई
दुसरीकडे, स्टार गोलंदाज साई किशोरने गुजरात टायटन्स संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. गुजरात टायटन्सकडून साई किशोर आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी जास्तीत जास्त दोन विकेट घेतल्या. साई किशोर आणि प्रसिद्ध कृष्णा व्यतिरिक्त, मोहम्मद सिराजने एक विकेट घेतली. गुजरात टायटन्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकांत 229 धावा करायच्या आहेत. दोन्ही संघांना हा सामना जिंकून स्पर्धेच्या क्वालिफायर 2 मध्ये आपले स्थान निश्चित करायचे आहे.