2023 नंतर एम एस धोनी IPL ला रामराम ठोकणार तर टीम इंडियाची महत्वपूर्ण जबाबदारी घेणार हाती

आयसीसीच्या तिन ट्रॉफीचा मानकरी असलेला कर्णधर एम एस धोनीला टी२० क्रिकेटबाबत महत्वाची जबाबदारी देण्याची चर्चा आहे.

Photo Credit - Dhoni

भारत क्रिकेटचा सामना हरला किंवा जिंकला. दोन्हीमध्ये चर्चा होते ती फक्त एका खेळाडूची. आता टीममध्ये नसला तरी त्याच्या सारखा कुणी नाही असं म्हणत संपूर्ण देश आठवण काढतो ते एका खेळाडूची तो म्हणजे एम एस धोनी (M S Dhoni). एम एसला आयुष्यात एकदा तरी मैदानावर खेळताना बघणं हे प्रत्येकासाठी स्वप्न. कॅप्टन कुलने सगळ्या प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी गडी मात्र मोठ्या जोशात आयपीएल खेळतो. फक्त धोनी (Mahendra Singh Dhoni) चेन्नई सुपर किंग्समध्ये (Chennai Super Kings) आहेत म्हणून लाखो चाहते चेन्नईला सपोर्ट करताना दिसतात. पण २०२३ च्या आयपीएल (IPL 2023) नंतर धोनी चेन्नई सुपर किंग्ससह आयपीएलला देखील रामराम ठोकणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे धोनीच्या चाहत्यांसाठी ही बॅड न्यूज (Bad News) असली तरी बीसीसीआय (BCCI) एक महत्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

 

आयसीसीच्या (ICC Trophy) तिन ट्रॉफीचा मानकरी असलेला कर्णधर एम एस धोनीला (M S Dhoni) टी२० क्रिकेटबाबत (Cricket) महत्वाची जबाबदारी देण्याची चर्चा आहे. बीसीसीआय (BCCI) कडून याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा केली नसली तरी एम एस कडे महत्वाची जबाबदारी सोपवली जाणार आहे. तरी धोनीच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. धोनीचा अनुभव, खेळण्याची शैली, कुल अन्ड काल्म नेचरचे लाखो चाहते आहे. भारतीय संघ धोनीच्या तालमित तयार झाल्यास तो संघासाठी आवश्यकचं ठरेल. (हे ही वाचा:- India Vs New Zealand: न्युझीलंड विरुध्द भारत सामान्याबाबत टीम न्यूझीलंडचा मोठा निर्णय, ‘या’ स्टार खेळाडू ऐवजी नव्या खेळाडूला संधी)

 

एम एस धोनीच्या रिटायरमेंटनंतर भारताने आजपर्यत आयसीसीची ट्रॉफी जिंकलेली नाही. धोनीकडे संघाची जबाबदारी असल्यास उत्तम प्रदर्शनासह लक फॅक्टर देखील भारतीय क्रिकेट संघाकडे चालून येईल अशी भारतीय चाहत्यांना अपेक्षा आहे. तरी बीसीसीआय काय निर्णय घेणार, त्या निर्णयावर एम एस धोनी काय प्रतिक्रीया देणार यावर सर्वांचं लक्ष लागलं आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

IND W vs IRE W 3rd ODI 2025 Live Telecast On DD Sports: भारत महिला विरुद्ध आयर्लंड महिला शेवटच्या ODI सामन्याचे थेट प्रक्षेपण फ्री डिशवर उपलब्ध असेल का? संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या

Army Day 2025: लष्कर दिनानिमित्त एपिक यूट्यूब चॅनेलवर नक्की पाहा सेनेची शौर्य गाथा सांगणारा 'द ग्रेनेडिअर्स - अ पिलर ऑफ पॉवर ऑफ द इंडियन आर्मी' हा विशेष माहितीपट

New Guidelines For Team India Players: ऑस्ट्रेलियातील पराभवानंतर BCCI ने घेतली कठोर भूमिका; खेळाडूंसाठी नवे नियम लागू, क्रिकेटपटूंच्या पत्नींचा दौऱ्यातील कालावधी झाला कमी

ICC Champions Trophy 2025 All Squads: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आतापर्यंत 'या' देशांनी जाहीर केले संघ, एका क्लिकवर पाहा खेळाडूंची संपूर्ण यादी

Share Now