MS Dhoni याला नाही आवरला आपल्या शेतातील स्ट्रॉबेरी खाण्याचा मोह, खाऊन पहा काय म्हणाला (Watch Video)

धोनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट केली आहे व त्यात तो आपल्या शेतातील स्ट्रॉबेरी खाताना दिसत आहे. धोनीने निवृत्तीनंतर इंस्टाग्रामवर पहिल्यांदा व्हिडिओ शेअर केला जो सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

एमएस धोनी खातोय शेतातील स्ट्रॉबेरी (Photo Credit: Instagram)

MS Dhoni Savours Strawberries From Farm: आयपीएल 2020 पूर्वी टीम इंडियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. धोनीने इंस्टाग्रामवर (MS Dhoni Instagram( एक व्हिडिओ पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर धोनी आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत आणि रांची (Ranchi) येथील आपल्या फार्महाउसमध्ये शेती करत आहे. आयपीएलनंतर धोनी पत्नी साक्षी, मुलगी झिवा आणि मित्रांसोबत दुबईमध्ये (Dubai) सुट्टीवर होता आणि नुकताच रांचीमध्ये दाखल झाला आहे. तो आता आपल्या कुटुंबासमवेत आपल्या फॉर्म हाऊसवर असून शेतीची कामं पाहत आहे. धोनी भारतात परतल्यावर थेट आपल्या शेतात पोहोचला आणि त्याला आपल्या शेतातील स्ट्रॉबेरी (Strawberry) खाण्याचा मोह आवरला नाही. धोनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट केली आहे व त्यात तो आपल्या शेतातील स्ट्रॉबेरी खाताना दिसत आहे. धोनीने निवृत्तीनंतर इंस्टाग्रामवर पहिल्यांदा व्हिडिओ शेअर केला जो सध्या जोरदार व्हायरल होत आहे. (MS Dhoni and Ziva Advertisement: महेंद्र सिंह धोनी आणि झिवा एकत्रित झळकणार जाहिरातीत, पहा वडील-लेकीच्या नात्यामधील गोडवा जपणारा व्हिडिओ)

धोनीने व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “जर मी शेतात जात राहिलो, तर बाजारासाठी एकही स्ट्रॉबेरी रहणार नाही.” धोनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये धोनी स्ट्रॉबेरीच्या रोपातून फळ तोडून खातात दिसत आहे. त्याने स्वतः हा व्हिडिओ बनवला असून त्याच्यामागे काही लोकं उभे असल्याचे दिसत आहे. यापूर्वी, झिवाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाला होता. आई साक्षीनंतर झिवाने बाबा धोनीसह जाहिरातीत पदार्पण केलं. धोनीसह झिवा ओरिओ बिस्कीटच्या जाहिरातीत झळकणार आहे. पहा धोनीच्या शेतातील हा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by M S Dhoni (@mahi7781)

दरम्यान, धोनीने 2019 वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये अंतिम सामना खेळत 15 ऑगस्ट, 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली होती. निवृत्तीनंतर तो आयपीएलमध्ये खेळला, मात्र त्याचा वैयक्तिक फॉर्म खूपच खराब होता. चेन्नई सुपर किंग्स संघाने देखील निराशाजनक कामगिरी केली आणि संघ पहिल्यांदाच प्ले ऑफमध्ये प्रवेश करवण्यात अपयशी ठरला. आयपीएल 2020 चा समारोप झाल्यानंतर धोनी दुबईत दीर्घ सुट्टीसाठी थांबला होता. घरी परतण्यापूर्वी, धोनीने युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री यांना डिनर पार्टीमध्येही आमंत्रित केले होते. धोनी आता थेट आयपीएल 2021 साठी मैदानावर उतरेल जिथे धोनीसह सीएसके संघाकडून चाहत्यांना उत्तम कामगिरीची अपेक्षा असेल.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif