VIDEO: लॉकडाउनमध्ये बाबा एमएस धोनीसोबत जिवाने लुटला बाईक राईडचा आनंद, मम्मी साक्षीने दिली अशी रिअक्शन
या लॉकडाउनमध्ये धोनी मुलगी जिवाला घेऊन बाईक चालवताना दिसला. या व्हिडिओमध्ये धोनी बाईकवर मुलगी जिवाला मागे बसून राईडचा आनंद घेत आहे. साक्षी धोनीने या व्हिडिओचे शूटिंग करताना कमेंट्री केली आहे.
टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) स्वत: सोशल मीडियावर सक्रिय राहत नाही. तरीही त्याच्या चाहत्यांना आपल्या हिरोची एक झलक पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहतात. धोनीची पत्नी साक्षी (Sakshi) आणि आयपीएलची टीम चेन्नई सुपरकिंग्स (Chennai Super Kings) यांनी त्यांच्या थलाचे (धोनी) फोटो किंवा व्हिडिओज शेअर करून चाहत्यांना खुश करत असतात. धोनीची पत्नी साक्षीने पुन्हा एकदा धोनीचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर लाईव्ह शेअर केला. हा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला. कोरोना व्हायरस आणि लॉकडाउनमुळे क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या असल्याने क्रिकेटर्स सध्या घरी कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. संपूर्ण भारतात लॉकडाउन असल्याने कोणालाही विनाकारण घराबाहेर पडण्याची मनाई आहे त्यामुळे धोनी आणि अन्य खेळाडू आपल्या कुटुंबातील सदस्यांसमवेत चांगली वेळ घालवत आहेत. या लॉकडाउनमध्ये धोनी मुलगी जिवाला घेऊन बाईक चालवताना दिसला. (IPL मध्ये एमएस धोनी म्हातारा म्हणून काढायचा छेड, 2018 फायनलनंतर धोनीने दिलेल्या शर्यतीच्या आव्हानाचा ड्वेन ब्रावोने केला खुलासा)
या व्हिडिओमध्ये धोनी बाईकवर मुलगी जिवाला मागे बसून राईडचा आनंद घेत आहे. साक्षी धोनीने या व्हिडिओचे शूटिंग करताना कमेंट्री केली आहे. व्हिडिओच्या सुरुवातीस साक्षी म्हणते, "येथे दोन मुलं खेळत आहेत... एक मोठा मुलगा आणि एक लहान मुलगा." धोनी सध्या त्याच्या रांचीमधील फार्महाऊसमध्ये आहे. व्हिडिओमध्ये धोनीने लाल रंगाचा टीशर्ट घातला आहे, तर जिवाने गुलाबी रंगाचा फ्रॉक घातला आहे.धोनी बाईक राईडसाठी रस्त्यावर आला नसून आपल्या फार्महाऊसच्या गार्डन परिसरातच त्याने राईडचा आनंद लुटला. पाहा व्हिडिओ:
दरम्यान, धोनी बऱ्याच महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. मागील वर्षी वर्ल्ड कप सेमीफायनलनंतर धोनी एकही आंतरराष्ट्रीय किंवा घरगुती क्रिकेट सामना खेळला नाही. यंदा इंडियन प्रीमिअर लीगमधून (आयपीएल) तो मैदानावर पुनरागमन करणार होता, पण भारतात कोरोना रुंगांच्या संख्येत होणारी वाढ पाहून बीसीसीआयच्या आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने टूर्नामेंट पुढील सूचना येई पर्यंत स्थगित केली आहे.