MS Dhoni Duped: एमएस धोनीला मित्रांनीचं लावला कोट्यावधीचा चूना; 2 माजी व्यावसायिक भागीदारांविरुद्ध गुन्हा दाखल
मिहिर दिवाकर आणि सौम्या विश्वास या दोघांनी 2017 मध्ये क्रिकेट अकादमी जागतिक स्तरावर चालवण्यासाठी करार केला होता. अहवालानुसार, कराराच्या अटींनुसार अर्का स्पोर्ट्सला फ्रँचायझी फी आणि महसूल सामायिक करायचा होता. मात्र, त्यांची पूर्तता झाली नसल्याचा धोनीचा आरोप आहे.
MS Dhoni Duped: अनुभवी फलंदाज महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) याची त्याच्या जवळच्या मित्रांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. मिहिर दिवाकर (Mihir Diwakar) आणि सौम्या विश्वास (Soumya Vishwas) नावाचे हे लोक धोनीचे बिझनेस पार्टनर (Business Partners) आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, धोनीने या दोघांविरोधात आता रांची कोर्टात फौजदारी केस दाखल केली आहे. मिहिर दिवाकर आणि सौम्या विश्वास या दोघांनी 2017 मध्ये क्रिकेट अकादमी जागतिक स्तरावर चालवण्यासाठी करार केला होता. अहवालानुसार, कराराच्या अटींनुसार अर्का स्पोर्ट्सला फ्रँचायझी फी आणि महसूल सामायिक करायचा होता. मात्र, त्यांची पूर्तता झाली नसल्याचा धोनीचा आरोप आहे.
अर्का स्पोर्ट्स मॅनेजमेंटला, कराराच्या अटींनुसार, फ्रँचायझी फी भरणे आणि नफ्याचे पैसे वाटून घेणे बंधनकारक होते. परंतु कथितरित्या तसे करण्यात आले नाही. वारंवार नोटीस देऊनही कराराच्या अटींकडे कथितपणे दुर्लक्ष करण्यात आले, ज्यामुळे धोनीने फर्मला 15 ऑगस्ट 2021 रोजी दिलेले अधिकार पत्र रद्द केले. धोनीने अनेक कायदेशीर नोटिसाही पाठवल्या, पण यावर काहीही कृती करण्यात आली नाही. (हेही वाचा -ICC Test Rankings: कसोटी इतिहासातील सर्वात लहान सामना जिंकूनही भारताचे नुकसान, हिसकावून घेतला नंबरचा 1 चा मुकुट)
धोनीने रांची कोर्टात लॉ फर्मच्या माध्यमातून केस दाखल केली आहे. धोनीच्या वकिलाने सांगितेल की, अर्का स्पोर्ट्स मॅनेजमेंटने चेन्नई सुपर किंग्जच्या (CSK) कर्णधाराची फसवणूक केली, ज्यामुळे 15 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले. आता धोनीने गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा - Rohit Sharma New Record: रोहित शर्माने मोठी कामगिरी करत केली धोनीची बरोबरी, असा पराक्रम करणारा 'हिटॅमन' ठरला पहिला भारतीय कर्णधार)
दरम्यान, माही चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चा कर्णधार म्हणून 2024 चा IPL सामना खेळण्यासाठी परत येणार आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे, अनुभवी कीपर-फलंदाज दुसर्या हंगामात परतेल अशी अनेकांना अपेक्षा नव्हती.