ICC Test Rankings: कसोटी इतिहासातील सर्वात लहान सामना जिंकूनही भारताचे नुकसान, हिसकावून घेतला नंबरचा 1 चा मुकुट
नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाने भारताला एका रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर ढकलले आहे. ऑस्ट्रेलिया सध्या पाकिस्तानसोबत कसोटी मालिका (AUS vs PAK) खेळत आहे. या मालिकेत यजमान संघ ऑस्ट्रेलियाने सलग दोन सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला आहे, तर तिसऱ्या सामन्यातही त्यांनी आघाडी कायम ठेवली आहे.
Team India Loses Number 1 Spot: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील भारतीय संघाने (Team India) केपटाऊनमध्ये कसोटी (Cape Town Test) इतिहासातील सर्वात लहान सामना 7 विकेटने जिंकला. मात्र असे असतानाही भारताची क्रमवारीत (ICC Test Ranking) एका स्थानाने घसरण झाली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाने भारताला एका रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर ढकलले आहे. ऑस्ट्रेलिया सध्या पाकिस्तानसोबत कसोटी मालिका (AUS vs PAK) खेळत आहे. या मालिकेत यजमान संघ ऑस्ट्रेलियाने सलग दोन सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला आहे, तर तिसऱ्या सामन्यातही त्यांनी आघाडी कायम ठेवली आहे. यामुळे पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाने आयसीसी क्रमवारीत गुणांची आघाडी मिळवली आहे. आयसीसीने शुक्रवारी नवीन कसोटी क्रमवारी जाहीर केली, ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया 30 सामन्यांमध्ये 3534 गुणांसह 118 रेटिंगवर नंबर वन बनला आहे. तर, भारतीय संघाने 32 सामन्यांत 3746 गुण मिळवले आहेत, परंतु संघाचे रेटिंग 117 आहे, जे ऑस्ट्रेलियापेक्षा थोडे मागे आहे. (हे देखील वाचा: IND W vs AUS W 1st T20 Live Streaming: वनडेतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी भारतीय महिला संघ टी-20 मध्ये भिडणार कांगारुशी, येथे पाहा थेट लाइव्ह)
A new No.1 side is crowned in the @MRFWorldwide ICC Men's Test Team Rankings 👑
More ⬇️
— ICC (@ICC) January 5, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 05, 2024 04:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

