MS Dhoni Birthday: ‘या’ 3 प्रसंगी ‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीला झाला होता राग अनावर, खेळाडूच नाही तर पंचांशी झाली होती ‘तू तू...मै मै’

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी 7 जुलै, 1981 (आज) आपल्या चाळीशीत पदार्पण करत आहे. धोनी क्रिकेटच्या मैदानावरील अत्यंत शांत खेळाडूंपैकी एक आणि त्याचमुळे त्याला ‘कॅप्टनकूल’ म्हणूनही ओळखले जाते. धोनीला मैदानात चिडलेले पाहणे तर दुर्मिळ गोष्ट आहे. पण अशा काही घडना क्रिकेट मैदानात घडल्या ज्यामुळे धोनीला राग अनावर झाला होता.

एमएस धोनी फोटो आणि एचडी वॉलपेपर (Photo Credit: Getty)

MS Dhoni Birthday: भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Cricket Team) माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) 7 जुलै, 1981 (आज) आपल्या चाळीशीत पदार्पण करत आहे. जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांच्या यादीत एमएस धोनीचा (MS Dhoni) समावेश होतो. 2007 टी-20, व 2011 वनडे विश्वचषक आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदावर भारताचं नाव कोरणारा 'कॅप्टन कूल' अशी ख्याती मिळवणाऱ्या धोनीचा आज 40 वा वाढदिवस आहे. महान खेळाडू धोनी क्रिकेटच्या मैदानावरील अत्यंत शांत खेळाडूंपैकी एक आणि त्याचमुळे त्याला ‘कॅप्टनकूल’ म्हणूनही ओळखले जाते. तथापि धोनीला मैदानात चिडलेले पाहणे तर दुर्मिळ गोष्ट आहे. पण अशा काही घडना क्रिकेट मैदानात घडल्या ज्यामुळे धोनीला राग अनावर झाला होता. यामुळे विरोधी संघातीलच नाही तर टीम इंडिया (Team India) खेळाडूंसोबत शिवाय मैदानावरील पंचांशी देखील त्याची ‘तू तू... मैं मैं’ झाली. आज धोनीच्या वाढदिवशी आपण अशाच काही दुर्मिळ क्षणांबाबत जाणून घेणार आहोत. (MS Dhoni-Sakshi Wedding Anniversary: लग्नाच्या 11व्या वाढदिवशी धोनीने पत्नी साक्षीला दिली व्हिंटेज भेट, पाहा Photo)

मनीष पांडेला सुनावलं

धोनी विकेट्सच्या मधे आपल्या चपळतेसाठी ओळखला जायचा. 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 सामन्यात धोनी आणि मनीष पांडेने 98 धावांची भागीदारी केली. डावाच्या 19व्या ओव्हरमध्ये धोनीला दोन धावा घ्यायच्या होत्या पण पांडेने दखल घेतली नाही व अखेर एका धावेवर त्याला समाधान मानावे लागले. पांडेने धावण्याचा हेतू न दाखवल्याबद्दल धोनी खूप चिडला आणि स्टम्प माइकवरून हे स्पष्ट झाले.

दिपक चाहरच्या नो बॉलवर चिडला

आयपीएल 2019 चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघातील सामन्यात पंजाबला 12 चेंडूत 39 धावांची गरज होती. डावाच्या 19व्या षटकात गोलंदाजी करण्यासाठी धोनीने चाहरकडे चेंडू सोपवला. चाहरने पहिले दोन चेंडू स्लो बॉल टाकले जे फलंदाजाच्या कमरेच्या वर असल्याने नो बॉल ठरले. या दोन चेंडूवर पंजाबने 8 धावा काढल्या. त्यामुळे लगेचच धोनी चाहरकडे आला आणि त्याच्याशी काही चर्चा केली. या चर्चेबद्दल चाहरने सामन्यानंतर सांगितले होते की धोनी त्याच्यावर प्रचंड चिडला होता. पण त्यांनतर चाहरने चांगले पुनरागमन करतान केवळ 5 धावा दिल्या व डेविड मिलरची विकेटही घेतली.

डगआऊटमधून धोनीने मैदानात येत घातला पंचांशी वाद

आयपीएल 2019 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यात धोनीने डगआऊटमधून थेट मैदानावर पोचल्याचा हा सर्वात चर्चेचा क्षण ठरला. लेग अंपायरने दर्शविलेल्या नो-बॉल कॉलमुळे सीएसकेचा कर्णधार खूष नव्हता आणि धोनी घडत असलेले पाहून स्पष्टपणे निराश होता. रविंद्र जडेजाने खेळलेल्या चेंडूवर मैदानावरील पंचांनी नो बॉलचा इशारा केला, पण लगेचच स्वेअर लेगवरील अंपायरशी चर्चा करुन निर्णय बदलला. त्यामुळे मैदानात असलेला जडेजा पंचाशी वाद घालू लागला आणि काही वेळात धोनीही मैदानात आला व त्याने पंचाशी चर्चा करत वाद घातल्याचे दिसले.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now