हे 3 भारतीय क्रिकेटपटू 2020 च्या आयसीसी टी-20 विश्वचषकसाठी टीम इंडियाचा भाग नसतील

त्याआधी भारतीय संघात असे काही खेळाडू आहे जे या स्पर्धेचा भाग नसतील. आपण पाहूया असे 3 मुख्य खेळाडू.

भारतीय संघ (Photo Credit: Twitter)

यंदाच्या आयसीसी (ICC) क्रिकट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे (Indian Team) आव्हान सेमीफायनलमध्येच संपुष्टात आहे. न्यूझीलंड (New Zealand) संघाकडून सेमीफायनलमध्ये पराभवानंतर टीम इंडिया तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंग झाले. आता आयसीसीची पुढील मोठी स्पर्धा म्हणजे 2020 मध्ये आयोजित होणारी महिला आणि पुरुषांचे टी-20 विश्वचषक. टी-20 विश्वचषकचे सर्व सामने ऑस्ट्रेलिया (Australia) मध्ये आयोजित केले जाणार आहे. महिलांचे सामने 21 फेब्रुवारी आणि 8 मार्चपर्यंत खेळे जातील तर पुरुषांचे ऑक्टोबर 18 ते नोव्हेंबर 15 या दरम्यान होतील. (सचिन तेंडुलकर याने निवडले आपले World Cup XI; केन विल्यमसन कर्णधार तर एम एस धोनीला डच्चू)

विश्वचषकमधील पराभव विसरून भारताला आता टी-20 विश्वचषकवर आपले लक्ष केंद्रित करायचे आहे. पण त्याआधी भारतीय संघात असे काही खेळाडू आहे जे या स्पर्धेचा भाग नसतील. आपण पाहूया असे 3 मुख्य खेळाडू:

एम एस धोनी (MS Dhoni)

भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी आत आपल्या करिअरच्या अंतिम चरणात आहे. इंग्लंडमध्ये आयोजित विश्वचषकमध्ये धोनीला आपल्याला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे चाहते आणि जाणकारांकडून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा सुरु आहे. येत्या काही दिवसात धोनी क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर करेल अशी अपेक्षा केली जात आहे. त्यामुळे, पुढील वर्षी होणार टी-20 विश्वचषक खेळणार की नाही यावर शंका आहे.

अजिंक्य राहणे (AJinkya Rahane)

अलीकडील वर्षांत मुंबईच्या अजिंक्य रहाणे याला भारतातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी मानले जात आहे. क्रिकेटच्या सर्वात छोट्या फॉर्ममध्ये, म्हणजेच टी-20 मध्ये राहणे याची कामगिरी सरासरीच्या आहे. पण असे दिसते की भारतीय संघ व्यवस्थापन रहाणेला टी-20 क्रिकेटसाठी योग्य समजत नाही. सर्वप्रथम, रहाणेला खेळी करण्यासाठी काही चेंडू खेळण्याची गरज असते आणि सीमारेषेच्या पलीकडे चेंडू मारण्याचा सतत प्रयत्न करणे हा केवळ खेळ नाही. एक खेळ जो केवळ 120 चेंडूं पुरता मर्यादित असतो अशा खेळासाठी अशा फलंदाजांकरिता तरतूद करणे योग्य नाही.

दिनेश कार्तिक (Dinesh Karthik)

भारतीय संघाचा नंबर चारसाठी मजबूत दावेदार मानला जाणारा दिनेश कार्तिक यंदाच्या विश्वचषकमध्ये आपला ढसा उमटवण्यास अयशस्वी झाला. टीम इंडियाची कमजोर कडी मानल्या जाणाऱ्या मधल्या फळीला मजबूत करण्याच्या हेतूने अनुभवी कार्तिकची निवड करण्यात अली होती. पण अन्य मधल्या फळीच्या खेळाडूंप्रमाणे दिनेशला देखील आपल्या नावाला शोभेल अशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे पुढील वर्षी होण्याऱ्या टी-20 विश्वचषकसाठी कार्तिकची निवड होणे कठीण आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये देखील त्याला प्रभावी खेळी करता आली नाही.

म्हणूनच या पाच भारतीय खेळाडूंची आगामी 2020 च्या आयसीसी टी -20 विश्वचषकसाठी निवड होऊ शकत नाही. पण हे ही लक्षात घेणे घरजेचे आहे की आयपीएल 2020 विश्वचषक टी -20 साठी भारतीय संघाच्या निवड प्रक्रियेत प्रमुख भूमिका बजावेल. आणि म्हणून भारताच्या या घरगुती लीगमध्ये या खेळाडूंची भूमिका महत्वाची ठरणार आहे.