Mohammed Shami Ruled Out of IPL 2024: मोठी बातमी! गुजरात टायटन्सला मोठा धक्का, मोहम्मद शमी आयपीएलमधून बाहेर

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी डाव्या घोट्याच्या दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला असून त्याला यूकेमध्ये शस्त्रक्रिया करावी लागेल अशी बातमी बीसीसीआयच्या सूत्राने पीटीआयला सांगितली आहे.

Mohammed Shami Ruled Out of IPL 2024: मोठी बातमी! गुजरात टायटन्सला मोठा धक्का, मोहम्मद शमी आयपीएलमधून बाहेर
मोहम्मद शमी (Photo Credit: PTI)

 IPL 2024: इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2024) 17 वा हंगाम 22 मार्चपासून सुरू होत आहे. या साठी दहा संघानी आपली जोरदार तयारी सुरु केली आहे. आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक अजुन जाहीर झाले नाही आहे पण लवकरच याचे वेळापत्रक जाहीर होइल अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) डाव्या घोट्याच्या दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला असून त्याला यूकेमध्ये शस्त्रक्रिया करावी लागेल अशी बातमी बीसीसीआयच्या सूत्राने पीटीआयला सांगितली आहे. त्यामुळे गुजरातच्या संघाला हा मोठा धक्का असणार आहे. याबाबत गुजरात टायटन्स अजून अधिकृत माहिती दिलेली नाही आहे. मोहम्मद शमी 2023 च्या विश्वचषकापासून संघाबाहेर आहे. त्याने या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती. त्याच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 22, 2024 02:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).