Mohammed Shami च्या T20 वर लागणार ब्रेक? निवडकर्त्यांचे फर्मान - तुम्ही खेळणार फक्त एकदिवसीय आणि कसोटी

महितीनुसार आता त्याचा खेळ T20 आंतरराष्ट्रीय मध्ये संपला आहे. आता त्याची संघात निवड होणार असेल तर फक्त वनडे (ODI) आणि कसोटी (Test) सामने खेळाण्यासाठी.

Mohammad Shami (Photo Credit - Twitter)

आशिया कपसाठी (Asia Cup 2022) संघ निवडायचा आहे. त्याच्यासाठी 15 ऐवजी एकूण 17 खेळाडूंची निवड केली जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. पण त्या 17 भारतीय चेहऱ्यांमध्येही मोहम्मद शमीचे (Mohammed Shami) नाव नसेल. का माहित आहे? कारण, निवडकर्त्यांनी त्याला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. महितीनुसार आता त्याचा खेळ T20 आंतरराष्ट्रीय मध्ये संपला आहे. आता त्याची संघात निवड होणार असेल तर फक्त वनडे (ODI) आणि कसोटी (Test) सामने खेळाण्यासाठी. इनसाइडस्पोर्टने शमीच्या संदर्भात आपल्या अहवालात याचा उल्लेख केला आहे. मोहम्मद शमीने टी20 विश्वचषक 2021 मध्ये शेवटचा T20I सामना खेळला. तेव्हापासून टीम इंडियाने हर्षल पटेल, दीपक चहर यांसारख्या अनेक गोलंदाजांना आजमावले आहे आणि त्यामुळेच शमीला बाहेर ठेवण्यात येणार आहे. शमीप्रमाणेच, वॉशिंग्टन सुंदर देखील भारताच्या T20 विश्वचषक 2022 योजनेचा भाग नाही.

T20I मध्ये मोहम्मद शमीला लागणार ब्रेक

टीम इंडियाच्या निवड समितीच्या एका सदस्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले की, "शमी आता तरुण नाही, त्यामुळे आम्ही त्याला कसोटीसाठी नव्याने तयार करण्याची गरज आहे. हेच कारण आहे की आम्ही त्याच्या नावाचा T20I मध्ये विचार करत नाही. आम्ही T20 विश्वचषकानंतर वर्कलोड मॅनेजमेंटबद्दल त्याच्याशी बोललो आहोत. सध्या T20 क्रिकेटसाठी तो भारतीय संघाच्या योजनेचा भाग नाही. आम्ही फक्त युवा खेळाडूंवर लक्ष केंद्रित करत आहोत. (हे देखील वाचा: Cricket CWG 2022: ठरलं तर! कॉमनवेल्थ गेम्स 2022 उपांत्य फेरीत भारताचा सामना होणार 'या' मजबूत संघाशी, जाणून घ्या तारीख आणि वेळ)

शमी खेळणार फक्त एकदिवसीय आणि कसोटी

मोहम्मद शमी गेल्या काही काळापासून भारताच्या तीन फॉरमॅटचा अविभाज्य भाग आहे, परंतु गेल्या वर्षी झालेल्या T20 विश्वचषकापासून तो T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकला नाही. भविष्यातही तो निवडून येईल याची शाश्वती नाही. सध्या, आशिया चषक 2022 नंतर टी -20 विश्वचषक 2022 होणार आहे आणि तो या संघात निवडला जाणार नाही कारण तो बर्याच काळापासून टी -20 क्रिकेट खेळत नसल्यामुळे पुढे कुठल्याही सामन्यात त्याला घेतले जाणार नाही. वेगवान गोलंदाजी आक्रमण अंतिम आहे, परंतु फिरकीपटूंबाबत अद्याप परिस्थिती अस्पष्ट आहे.