हे 5 महान कर्णधार आपल्या कारकिर्दीत नाही उंचावू शकले ICC ट्रॉफी, यादीत एक भारतीय दिग्गजाचाही समावेश

तथापि, असे काही महान कर्णधार आहेत जे आपल्या कारकिर्दीत एकही आयसीसी ट्रॉफी जिंकू शकले नाहीत. आतापर्यंत आयसीसीची ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरलेल्या 5 महान कर्णधारांची नावे खालीलप्रमाणे आहे.

एबी डीव्हिलियर्स (Photo Credit: Getty Images)

न्यूझीलंड कर्णधार केन विल्यमसन आणि भारतीय कॅप्टन विराट कोहली आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (ICC World Test Championship Final) सामन्यातून पहिली आयसीसी ट्रॉफी (ICC Trophy) उंचावण्यासाठी सज्ज होत आहे. यापूर्वी, 2019 वर्ल्ड कप स्पर्धेत किवी संघाने सेमीफायनल सामन्यात ‘विराटसेने’चे आव्हान संपुष्टात आणले होते तर ब्लॅककॅप्सने अवघ्या काही धावांच्या फरकाने आयसीसीची (ICC) प्रतिष्टीत ट्रॉफी इंग्लंडच्या हाती गमावली. भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आयसीसीच्या तीन (टी-20, वनडे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी) करंडक उंचावणारा एकमेव खेळाडू आहे. धोनी वगळता कपिल देव, इमरान खान, रिकी पाँटिंग यांना महान कर्णधार म्हणून ओळखले जाते ज्यांनी आपल्या देशाला विश्वचषक (World Cup) विजेतेपदाचा मान मिळवून दिला आहे. तथापि, असे काही महान कर्णधार आहेत जे आपल्या कारकिर्दीत एकही आयसीसी ट्रॉफी जिंकू शकले नाहीत. आतापर्यंत आयसीसीची ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरलेल्या 5 महान कर्णधारांची नावे खालीलप्रमाणे आहे. (T20 World Cup: 2024 पासून टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत 20 संघात होणार रस्सीखेच, ICC संघांची संख्या वाढवण्याच्या विचारात)

ग्रीम स्मिथ- दक्षिण अफ्रीका

स्मिथ (Graeme Smith) आतापर्यंतचा एक महान आणि निश्चितच दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) सर्वोत्तम कर्णधार आहे यात काही शंका नाही. 2003 च्या विश्वचषकातील भीषण कामगिरीनंतर स्मिथला अगदी लहान वयातच कर्णधारपदाची जबाबदार सोपवण्यात आली. स्मिथने केवळ फलंदाजीच्या जोरावर पुढाकारातून नेतृत्व केले नाही तर त्याचे नेतृत्व कौशल्य देखील अव्वल श्रेणी होते. त्यानंतर, स्मिथने ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकल्या आणि दक्षिण आफ्रिकेला कसोटी क्रमांकात अव्वल स्थान मिळवून दिले. पण आयसीसी ट्रॉफी जिंकण्यामागे तो अपयशी ठरला. 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनल आणि 2011 वर्ल्ड कपच्या क्वार्टरफायनल सामन्यात पराभवाचे तोंड पाहावे लागले.

महेला जयवर्धने- श्रीलंका

या यादीतील पुढील नाव श्रीलंकेच्या (Sri Lanka) महान खेळाडू महेला जयवर्धनाचे (Mahela Jayewardene) आहे. स्टाईलिश फलंदाजाने बॅटने संघासाठी सर्वकाही केले परंतु एक गोष्ट म्हणजे महेला कर्णधार म्हणून आयसीसीची ट्रॉफी मिळवू शकला नाही. 2007 मध्ये श्रीलंकेने कॅरेबियन बेटांवर झालेल्या वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता. संपूर्ण विश्वचषकात महेला आपल्या संघाचे नेतृत्व करत होता. पण त्यानंतर अंतिम सामन्यात महेला आणि संघाने पॉवरहाऊस ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध गुडघे टेकले. फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने एकतर्फी खेळी करत तिसऱ्या वर्ल्ड कप विजेतेपदाचा मान मिळवला आणि कर्णधार म्हणून महेलाने वर्ल्ड कप जिंकण्याच्या प्रतीक्षेत कारकिर्दीचा शेवट केला.

वसीम अक्रम- पाकिस्तान

1992 च्या विश्वचषक फायनलमध्ये पाकिस्तानने (Pakistan) इतिहास घडवला तेव्हा स्विंगचा सुलतान वसीम अक्रमने (Wasim Akram) स्वतःची एक ओळख निर्माण केली. इमरान खानच्या नेतृत्वात पाकिस्तानला त्याने पहिली सर्वात मोठी ट्रॉफी उंचावण्यात मोलाची भूमिका बजावली. 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात अक्रमला पाकिस्तान संघाचा कर्णधार म्हणून नेमण्यात आले. भयानक गोलंदाजी व नेतृत्व करत त्याने पाकिस्तानला जगभरात असंख्य मालिकांमध्ये विजय मिळवून दिला. त्यानंतर इंग्लंडमध्ये 1999 च्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान सलग दुसरे विजेतेपद उंचावेल असे दिसत होते पण स्टीव्ह वॉ यांच्या ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा धुव्वा उडवला व लॉर्ड्स विश्वचषक जिंकला.

मोहम्मद अझरुद्दीन- भारत

तीन विश्वचषकात भारताचे नेतृत्व करणारा एकमेव कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने (Mohammad Azharuddin) आशियाई दिग्गज कर्णधार म्हणून 47 कसोटी सामने खेळले. अझरने सर्व फॉर्मेटमध्ये 221 सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले. महेंद्र सिंह धोनीनंतर अझरच्या नेतृत्वात भारताने दोन स्वरूपात सर्वोत्कृष्ट(47.05) विजय मिळवला आहे. अझरुद्दीनच्या नेतृत्वात भारताने 1996 विश्वचषक उपांत्य फेरीत प्रवेश केला.

एबी डिव्हिलियर्स- दक्षिण आफ्रिका

दक्षिण आफ्रिकेचा आणखी एक महान कर्णधार एबी डिव्हिलियर्सचा (AB de Villiers) या यादीत समावेश आहे. 2015 विश्वचषक स्पर्धेपूर्वी डिव्हिलियर्सच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिका वर्ल्ड कप उंचावण्यासाठीचा प्रबळ दावेदार होता. माजी क्रिकेटपटू फलंदाज व कर्णधार म्हणून आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये होता. 2015 वर्ल्ड कप सेमीफायनल सामन्यात त्यांच्यापुढे न्यूझीलंडचे आव्हान होता. सर्वात गरजेचे असताना दक्षिण आफ्रिकी खेळाडूंनी दमछाक केली. पराभवानंतर डिव्हिलियर्ससह संपूर्ण दक्षिण आफ्रिकेचा संघ निराश झाला. दक्षिण आफ्रिचेचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आले.