BCCI वर या कारणामुळे महिला व पुरुष टीम इंडियामध्ये पक्षपात करण्याचा आरोप, मिताली राज व हरमनप्रीत कौरने दिले स्पष्टीकरण

असत्यापित अहवालानुसार खेळाडूंना मुंबईत आणण्यासाठी चार्टर्ड प्लेन फक्त पुरुष खेळाडूंसाठीच करण्यात आली होती, तर महिला क्रिकेटपटूंना कमर्शिअल मार्गावर जाण्यास सांगितले जाऊ शकते. मात्र टी-20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि कसोटी, वनडे कर्णधार मिताली राजने बीसीसीआयवरील आरोप फेटाळून लावले आहे.

भारतीय महिला क्रिकेटर मिताली राज (Photo Credit: Facebook)

भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट टीम इंग्लंडच्या (India Tour of England) महत्वाच्या दौर्‍यासाठी तयार आहेत आणि कोरोना व्हायरसच्या अभूतपूर्व काळात कठोर क्वारंटाईन नियमांचे पालन करणे त्यांच्या तयारीचा भाग आहे. रिपोर्ट्सनुसार, खेळाडूंना इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी मुंबईत (Mumbai) 2 आठवड्यांसाठी हॉटेलच्या खोल्यांमध्ये क्वारंटाईन केले जाईल आणि साउथॅम्प्टनला (Southampton)  पोहचल्यावर पुन्हा आणखी 10 दिवस ते स्वत:ला आयसोलेट करतील. परिस्थितीमुळे पुरुष व महिला संघातील दोन्ही खेळाडू मुंबईसाठी रवाना होऊ लागले आहे. यादरम्यान, मंगळवारी बीसीसीआय (BCCI) वर पुरुष व महिला संघ यांच्यात पक्षपात करण्याचा आरोप करण्यात आला होता. असत्यापित अहवालानुसार खेळाडूंना मुंबईत आणण्यासाठी चार्टर्ड प्लेन फक्त पुरुष खेळाडूंसाठीच करण्यात आली होती, तर भारतीय महिला क्रिकेटपटूंना (India Women's Cricket Team) कमर्शिअल मार्गावर जाण्यास सांगितले जाऊ शकते. मात्र महिला टी-20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) आणि कसोटी, वनडे संघाची कर्णधार मिताली राजने (Mithali Raj) बीसीसीआयवरील आरोपांवर स्पष्टीकरण देत आरोप फेटाळून लावले आहे. (India Tour of England 2021: लढतीपूर्वी कठोर निर्बंध, भारतीय संघ 24 दिवस राहणार क्वारंटाईन; पहा टीम इंडिया क्रिकेटपटूंसाठी असे आहेत नियम)

पुरुष आणि महिला क्रिकेट संघातील खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी यांच्यासाठी चार्टर्ड आणि व्यावसायिक उड्डाणे या विषयावरील चर्चेला दोघींनी पूर्णविराम लावला. हरमनप्रीतने ठामपणे सांगितले की बीसीसीआयने सर्व खेळाडूंसाठी चार्टर्ड उड्डाणे आयोजित केली आहेत आणि खेळाडूंच्या सोयीनुसार वैयक्तिकरित्या निवड करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, त्याच अहवालात असेही सुचवले होते की पुरुष खेळाडूंसाठी आरटी-पीसीआर टेस्ट घरी उपलब्ध करून दिल्या आहेत, परंतु महिला खेळाडूंसाठी नाहीत. कर्णधार मिताली राजने याबाबत स्पष्टीकरण दिले आणि हे चुकीचे असल्याचे म्हटले. “महामारीमध्ये प्रवास करणे हे एक मोठे आव्हान आहे, परंतु बीसीसीआयने आपल्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी केलेल्या विस्तृत व्यवस्था सांत्वनदायक आहेत. मुंबई आणि यूकेसाठी चार्टर विमान व घरात आरटी-पीसीआर टेस्ट,” मितालीने आपल्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटले.

हरमनप्रीत कौर

भारतीय संघ 2 जून रोजी इंग्लंडला रवाना होईल, तर 16 जूनपासून इंग्लंडविरुद्ध ते एकमेव कसोटी सामना खेळतील. तब्बल 7 वर्षानंतर भारतीय संघ कसोटी क्रिकेट खेळणार आहे. हा सामना ब्रिस्टल येथे खेळला जाईल. यानंतर दौर्‍यावर तीन वनडे आणि टी-20 सामन्यांची मालिकादेखील खेळली जाईल. यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली असून शेफाली वर्माला कसोटी आणि वनडे संघात पहिल्यांदा संधी देण्यात आली आहे.