Coronavirus: धावपटू मिल्खा सिंह यांची डॉक्टर कन्या न्यूयॉर्क येथे रुग्णसेवेत मग्न; कुटुंबीय चिंतेत असूनही कर्तव्य पालन कायम
मोना अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील न्यूयॉर्कमधील मेट्रोपॉलिटन हॉस्पिटल सेंटरमध्ये एक डॉक्टर म्हणून आपले कर्तव्य पार पडत आहे. अमेरिकेत कोरोना बाधित लोकांची स्थिती सध्या अंत्यंत गंभीर आहे.
संपूर्ण जग सध्या कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीशी झुंज देत आहे. या व्हायरसने लाखो लोकांचा बळी घेतला आहे आणि सध्या या रुग्णालयात 24 लाखाहून अधिक लोक जीवांसाठी संघर्ष करत आहे. प्रत्येकजण कोरोनाचा सामना करणाऱ्यांची मदत करण्याचा आपल्या परीने प्रयत्नशील आहे. भारताचे महान धावपटू मिल्खा सिंह (Milkha Singh) यांची डॉक्टर मुलगी मोना मिल्खा सिंह (Mona Milkha Singh) सध्या कोरोना रुग्णांवर उपचार करत आहे. मोना अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील न्यूयॉर्कमधील (New York) मेट्रोपॉलिटन हॉस्पिटल सेंटरमध्ये एक डॉक्टर म्हणून आपले कर्तव्य पार पडत आहे. अमेरिकेत कोरोना बाधित लोकांची स्थिती सध्या अंत्यंत गंभीर आहे. अमेरिकेत या आजारामुळे आतापर्यंत 40 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मिल्खा सिंह आणि त्यांचे कुटुंब इथे भारत आहे. मिल्खा यांच्याशी नुकतंच न्यूज एजन्सी एएनआयशीने संवाद साधला. या दरम्यान मिल्खा यांनी आपल्या मुलींबाबत अभिमान व्यक्त केला. (Coronavirus उपचारांवर Hydroxychloroquine विशेष फायदेशीर नाही; संशोधकांचा दावा)
मिल्खा म्हणाले,"माझी मुलगी मोना मिल्खा सिंह न्यूयॉर्कमध्ये डॉक्टर आहे. आम्हाला तिचा खूप अभिमान आहे. ती आमच्याशी दररोज बोलते आणि स्वतःची काळजी घेण्यास सांगते. आम्हाला तिच्याबद्दल चिंता आहे पण तिचे कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे." दरम्यान, काही दिवसांपूर्वी फ्लाइंग शीख म्हणून ओळखल्या जाणार्या माजी ऑलिम्पियन मिल्खा यांच्या मुलीचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये मिल्खा यांची मुलगी सहकारी डॉक्टरांसोबत बसलेली दिसत होती आणि ती सध्या अमेरिकेत कोरोनाविरूद्ध महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचे सांगण्यात येत होते.
देश आणि जगातील सर्व लोक कोरोनाविरूद्ध लढाई लढत आहेत. काही अज्ञात चेहरे त्यांच्या स्वत:च्या मार्गाने कोरोनाविरूद्ध लढण्यात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. नुकतंच स्पेनमधील टॅक्सी चालकाचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. हा टॅक्सी चालक कोरोना रुग्णांना हॉस्पिटल आपल्या टॅक्सी विनामूल्य नेट असल्याचे सांगण्यात येत होते. या व्हिडिओमध्ये दर्शवले गेले की टॅक्सीचालक जेव्हा पुन्हा एकदा रुग्णालयात पोहोचतो तेव्हा उपस्थित लोकं त्याचे टाळ्यांच्या गजराने स्वागत करतात, तसेच त्याला रोख व्हाउचरही देतात. पाहा स्पेनमधील टॅक्सी चालकाचा व्हिडिओ:
अमेरिकेत गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूने 2751 लोकांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने याची माहिती दिली. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत कोविड-19 मुळे 45,000 हून अधिक लोकं मरण पावले आहेत, तर 824,000 हून अधिक लोक संसर्गित झाले आहेत.