मायकेल वॉन याने संजय मांजरेकर याला ट्रोल करत केले ट्विटरवर ब्लॉक, रवींद्र जडेजा वरून सुरु झाला वाद
दरम्यान, या परिस्थितीत देखील वॉनने मांजरेकरांची मजा घेण्याचे सोडले नाही.
माजी ऑस्ट्रेलिया क्रिकेटपटू मायकेल वॉन (Michael Vaughan) आणि माजी भारतीय क्रिकेटपटू आणि आयसीसी (ICC) समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांच्यातील वाद अगदी टोकाला येऊन पोचला आहे. न्यूझीलंड (New Zealand) विरुद्ध आयसीसी क्रिकेट विश्वचषक सामन्यात रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याला घेण्याबद्दल मांजरेकर आणि वॉन यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. आणि आता तो इथपर्यंत पोहचला आहे की मांजरेकर यांनी वॉन यांनी ट्विटरवर ब्लॉक देखील केले आहेत. दरम्यान, या परिस्थितीत देखील वॉनने मांजरेकरांची मजा घेण्याचे सोडले नाही. ()
मांजरेकरांनी त्यांना ब्लॉक केल्याची माहिती देत वॉनने त्यांनाच ट्रोल केले. वॉनने लिहिले, " ब्रेकिंग न्युज... " ... संजय मांजरेकरयांनी मला ब्लॉक केलेत.माझे जीवन आता क्रमबद्ध आहे !!!! # ओनॉन @ द पॉईंट, ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड".
मांजरेकर आणि वॉनमधील वाद भारत (India) विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात जडेजाला प्लेयिंग इलेव्हनमध्ये घेण्यापासून सुरु झाला. मांजरेकर यांनी सेमीफायनलसाठी भारतीय संघातील प्लेयिंग इलेव्हनचे भाकीत करताना जडेजाला स्थान दिले आणि त्यानंतर वॉनने त्यांना पायचीत केले. वॉन यांनी मांजरेकर यांना ट्विट करत लिहिले, "शेवटी, तुम्ही जडेजाला प्लेयिंग इलेव्हनमध्ये स्थान दिले." यानंतर दोघांमध्ये ट्वीटरवर बरीच चर्चा झाली आणि याचा परिणाम म्हणजे मांजरेकर यांनी मायकल वॉनला ब्लॉक केले.
याआधी साखळी सामन्यात भारताला इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर मांजरेकर यांनी एम एस धोनी व के. एल राहुल यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते तसेच रवींद्र जाडेजा फारसा महत्त्वाचा खेळाडू नाही, अशीही टिप्पणी केली होती. त्यावर जाडेजाने मांजरेकरला ट्विटरवर प्रत्युत्तर दिले आहे. 'तुमच्यापेक्षा मी दुप्पट सामने खेळलो आहे आणि अजूनही खेळतो आहे. ज्यांनी काही मिळविले आहे त्यांच्याबद्दल आदर राखा. तुमची ही बकवास मी खूप सहन केली.', अशा शब्दांत जाडेजाने मांजरेकरला खडेबोल सुनावले.