MI vs SRH IPL 2021 Match 9: हैदराबादच्या ‘ऑरेंज आर्मी’चा फ्लॉप शो सुरूच, चेपॉकवर गमावला सलग तिसरा सामना; मुंबईने हिसकावला विजयाचा घास!
मुंबईने दिलेल्या 151 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात हैदराबादची ‘ऑरेंज आर्मी’ 137 धावाच करू शकली ज्यामूळे संघाला पुन्हा एकदा पराभव पत्करावा लागला आहे. विशेष म्हणजे चेपॉकवर स्टेडियमवर झालेल्या मागील तीन सामन्यातील हैदराबादचा हा सलग तिसरा पराभव ठरला आहे.
MI vs SRH IPL 2021 Match 9: चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) विकेटने सनरायझर्स हैदराबादवर (Sunrisers Hyderabad) दणदणीत 13 विजय मिळवला आहे. मुंबईने दिलेल्या 151 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात हैदराबादची ‘ऑरेंज आर्मी’ 137 धावाच करू शकली ज्यामूळे संघाला पुन्हा एकदा पराभव पत्करावा लागला आहे. विशेष म्हणजे चेपॉकवर स्टेडियमवर झालेल्या मागील तीन सामन्यातील हैदराबादचा हा सलग तिसरा पराभव ठरला असून या मैदानावर संघाला एकदाही सामना जिंकता आलेला नाही. संघासाठी जॉनी बेयरस्टोने (Jonny Bairstow) सर्वाधिक 43 धावा केल्या तर कर्णधार डेविड वॉर्नरने (David Warner) 36 धावा आणि विजय शंकरने 28 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, मुंबईकडून राहुल चाहरने (Rahul Chahar) पुन्हा एकदा चेंडूने आपली शानदार कामगिरी सुरूच ठेवली. मुंबईसाठी राहुल आणि ट्रेंट बोल्टने प्रत्येकी 3 तर जसप्रीत बुमराह आणि कृणाल पांड्याने प्रत्येकी 1 विकेट घेतली. (Rohit Sharma याच्यानंतर ‘हे’ 3 बनू शकतात Mumbai Indians चे कर्णधार, 5-वेळा आयपीएल चॅम्पियनकडे आहेत दमदार पर्याय)
टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत मुंबई इंडियन्सने किरोन पोलार्डच्या अखेरच्या ओव्हरमधील फटकेबाजीच्या जोरावर 150 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात वॉर्नर-बेयरस्टोच्या जोडीने संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. दोघांनी फटकेबाजी करत संघासाठी अर्धशतकी भागीदारी केली आणि पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता 57 धावा केल्या. ऑस्सी-इंग्लिश फलंदाजांची सलामी जोडी पुन्हा एकदा संघाला विजय मिळवून देईल असे दिसत असताना बेयरस्टो स्वत:च्या चुकीने हिट विकेट आऊट झाला. त्यानंतर संघ नियमित अंतराने विकेट गमावत राहिला. मनिष पांडेच्या रुपात हैदराबादला दुसरा झटका बसला. पांडे अवघ्या 2 धावाच करू शकला. त्यानंतर कर्णधार वॉर्नर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात रनआऊट झाला. पॉइंटवर असलेल्या हार्दिकच्या डायरेक्ट थ्रोमुळे वॉर्नर नॉन स्ट्राईक एंडवर धावबाद झालाहोऊन तंबूत परतला. विराट सिंह 11 धावा करुन आऊट झाला. आता सामना हैदराबादच्या हातून निसटताना दिसताना विजय शंकरने 16व्या ओव्हरमध्ये कृणालच्या गोलंदाजीवर सलग दोन षटकार खेचत संघाच्या आशा पल्लवित ठेवल्या. मात्र, निर्णायक क्षणी हार्दिक पांड्याच्या अचूक थ्रोने संघाचा विजय निश्चित झाला.
यापूर्वी, मुंबईकडून क्विंटन डी कॉकने सर्वाधिक 40 धावा केल्या तर कर्णधार रोहित शर्माने 32 धावांचे योगदान दिले. तसेच पोलार्डने नाबाद 35 धावांची निर्णायक खेळी केली. हैदराबादसाठी मुजीब उर रहमान आणि विजय शंकर यांना प्रत्येकी 2 विकेट्स मिळाल्या.