MI vs SRH IPL 2021 Match 9: Jasprit Bumrah याचा मोठा धमाका, आयपीएलमध्ये चौथ्यांदा केली ‘ही’ खास कमाल
मुंबईने पहिले फलंदाजी करून 150 धावांपर्यंत मजल मारली ज्याच्या प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबाद 137 धावांवर ढेर झाले. जसप्रीत बुमराहने परत डेथ ओव्हरमध्ये आपली योग्यता सिद्ध केली. बुमराहने आपल्या 4 ओव्हरमध्ये 14 धावा देत 1 विकेट घेतली पण अशी एक कामगिरीची नोंद केली.
MI vs SRH IPL 2021 Match 9: मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर लो-स्कोअरिंग सामना जिंकला. मुंबईने पहिले फलंदाजी करून 150 धावांपर्यंत मजल मारली ज्याच्या प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) 137 धावांवर ढेर झाले. राहुल चाहरने पुन्हा एकदा आपल्या सुरुवातीच्या फिरकीच्या बळावर हैदराबाद संघात दबाव आणला आणि अखेरीस ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) जोडीने सामना मुंबईच्या झोळीत टाकला. शिवाय बुमराहने परत डेथ ओव्हरमध्ये आपली योग्यता सिद्ध केली. बुमराहने आपल्या 4 ओव्हरमध्ये 14 धावा देत 1 विकेट घेतली पण अशी एक कामगिरीची नोंद केली जे आजवर कमीच गोलंदाज करू शकले आहेत. (MI vs SRH IPL 2021 Match 9: मुंबई इंडियन्सची गाडी पटरीवर परतली, ‘हे’ 3 ठरले गेम चेंजर)
बुमराहने आपल्या आजच्या 4 ओव्हरमध्ये हैदराबाद फलंदाजांवर इतका दबाव आणला की विरोधी संघाचा एकही फलंदाजी त्याच्या गोलंदाजीवर चौकार खेचु शकला नाही. इंडियन प्रीमियर लीगमध्ये आपल्या आजवरच्या कारकिर्दीत आपल्या 4 ओव्हरमध्ये एकही चौकार न देण्याची ही चौथी वेळ ठरली. इतकंच नाही तर बुमराहने 19व्या ओव्हरमध्ये 15 धावांचा बचाव केला. बुमराहने 2013 मध्ये मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि मागील 7 वर्षांपासून तो फ्रँचायझीचा प्रमुख भाग बनला आहे. दुखापत वगळता बुमराह नियमित संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळताना दिसतो. शिवाय, सामन्यात त्याला विकेट मिळाली नसली तरी तो अधिक धावा खर्च करत नाही.
सामन्याबद्दल बोलायचे तर सनरायझर्स हैदराबाद विरोधात झालेल्या सामन्यात रोहित शर्माच्या मुंबई संघाने 13 धावांनी विजयासह मोसमातील सलग दुसरा सामना जिंकला. यापूर्वी आयपीएल 14 च्या पहिल्या सामन्यात संघाला आरसीबीकडून पराभव पत्करावा लागला आहोत. मुंबईच्या विजयात गोलंदाजांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. संघासाठी बोल्ट आणि चाहरने प्रत्येकी तीन गडी बाद केले तर क्रुणाल पांड्या आणि बुमराहला प्रत्येकी 1 विकेट मिळाली. शिवाय, फलंदाजीत संघाचा कॅरेबियन अष्टपैलू खेळाडू कीरोन पोलार्डने 22 चेंडूत 35 धावांची नाबाद खेळी केली तर लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीवीर जॉनी बेअरस्टोने हैदराबाद संघासाठी सर्वाधिक 43 धावा केल्या.