ICC Hall Of Fame: सचिन तेंडुलकर, अॅलन डोनाल्ड, कॅथ्रीन फिट्जपॅट्रिक यांचा आयसीसीच्या ‘क्रिकेट हॉल ऑफ फेम’ मध्ये समावेश
सचिनसह दक्षिण आफ्रिका चे माजी वेगवान गोलंदाज अॅलन डोनाल्ड, आणि ऑस्ट्रेलियाची माजी जलद गोलंदाज कॅथ्रीन फिट्जपॅट्रिक यांना देखील क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये स्थान देण्यात आले आहे.
भारताचा आणि क्रिकेट विश्वाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांना आयसीसीने क्रिकेट हॉल ऑफ फेम (ICC Hall of Fame) मध्ये समावेश केला आहे. सचिनसह दक्षिण आफ्रिका चे माजी वेगवान गोलंदाज अॅलन डोनाल्ड (Allan Donald), आणि ऑस्ट्रेलियाची माजी जलद गोलंदाज कॅथ्रीन फिट्जपॅट्रिक (Cathryn Fitzpatrick) यांना देखील क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये स्थान देण्यात आले आहे. गुरुवारी लंडनमध्ये झालेल्या कार्यक्रमात आयसीसीचे मुख्य कातकरी अधिकारी मनू साहनी यांनी या तीन खेळाडूंच्या नावांची घोषणा केली.
सचिनच्याआधी भारताचे माजी क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी, कपिल देव, सुनील गावस्कर, अनिल कुंबळे, राहुल द्रविड यांचा आयसीसीने क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समावेश केला होता. सचिन याने भारतासाठी 200 टेस्ट सामने खेळले आहे. शिवाय टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आणि टेस्ट शतकांचा रेकॉर्ड सचिनच्या नावावर आहे. नोव्हेंबर 2013 मध्ये तेंडुलकरने आपला शेवटचा टेस्ट सामना खेळला. त्यांचा शेवटचा टेस्ट सामना हा वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळाला गेला.
दुसरीकडे, 'व्हाइट लाइटनिंग' म्हणून ओळखल्या जाणार्या डोनाल्ड यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये 330 आणि वनडे सामन्यात 272 विकेट्स घेतल्या होत्या आणि कुठल्यवादाशिवाय ते दक्षिण अफ्रिकेचे वेगवान गोलंदाज होते. त्यांनी फेब्रुवारी 2003 मध्ये शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. तर आयसीसीचा हा पुरस्कार जिंकणारी आठवी महिला फिट्जपॅट्रिक हिने ऑस्ट्रेलियाला दोन आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक जिंकण्यास मदत केली आणि 13 कसोटीत त्यांनी 60 विकेट देखील पूर्ण केले. 16 वर्षांच्या कालावधीत त्या महिला क्रिकेटमधील सर्वात वेगवान गोलंदाज ठरली होत्या. आणि आपल्या करिअरमध्ये त्यांनी 109 सामन्यात 180 विकेट घेतल्या.