Vitality T20 Blast सामन्यादरम्यान महिला प्रेक्षकासोबत पुरुषाकडून गैरवर्तन; कृत्य कॅमेऱ्यात कैद, सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल
लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे 25 जून रोजी सरे आणि मिडलसेक्स यांच्यात झालेल्या व्हिटॅलिटी टी-20 ब्लास्ट सामन्यादरम्यान एका पुरुष प्रेक्षक महिला प्रेक्षकासोबत अश्लील हावभाव करताना आढळला ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. महिला प्रेक्षकाने त्या माणसाच्या कृत्यावर आक्षेप घेत नसल्याने दोघे मित्र असल्याचे मानले जात आहे.
लंडनमधील केनिंग्टन ओव्हल (Kennington Oval) येथे 25 जून रोजी सरे (Surrey) आणि मिडलसेक्स (Middlesex) यांच्यात झालेल्या व्हिटॅलिटी टी-20 ब्लास्ट (Vitality T20 Blast) सामन्यादरम्यान एका पुरुष प्रेक्षक महिला प्रेक्षकासोबत अश्लील हावभाव करताना आढळला ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. सामन्यात सरेने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मिडलसेक्सकडून स्टीव्ह एस्कीनाजीने 64 (7 चौकार आणि 1 षटकार) आणि डॅरेल मिचेलने 58 (5 चौकार आणि 3 षटकार), तर ल्यूक होलमनने 19 धावा आणि क्रिस ग्रीनने 15 धावा केल्या. अशाप्रकारे मिडलसेक्सने 20 ओव्हरमध्ये 174/7 धावसंख्यापर्यंत मजल मारली. प्रयुततरात जेव्हा सरे संघ धावसंख्येचा पाठलाग करत होता तेव्हा 19व्या ओव्हरदरम्यान कॅमेरामॅनची नजर स्टेडियममधील प्रेक्षकांकडे वळली.
यादरम्यान, एक महिला प्रेक्षक उभी राहून तिच्या मागे बसलेल्या व्यक्तीशी बोलत होती तेव्हा तिच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीने तिला आक्षेपार्ह पद्धतीने स्पर्श केला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि त्या महिला प्रेक्षकाने त्या माणसाच्या कृत्यावर आक्षेप घेत नसल्याने दोघे मित्र असल्याचे मानले जात आहे. कॅमेरामनने आपल्या कॅमेऱ्यात संपूर्ण घटना रेकॉर्ड केली परंतु त्या माणसाचे अश्लील चाले पकडताच कॅमेरामॅनने पुन्हा टीव्ही प्रेक्षकांचे लक्ष खेळाकडे वळवले. संबंधित पुरुष व्यक्तीच्या हातात एक ड्रिंक आहे आणि महिला प्रेक्षक आपल्या पाठीमागे बसलेल्या व्यक्तीशी बोलण्यासाठी वारंवार त्याच्या खांद्यावर टेकलेली दिसून येत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर या व्यक्तीला ट्रोल केले जात असून त्याच्याविरुद्ध कठोर कारवाईचीही मागणी केली जात आहे.
सामन्याबद्दल बोलायचे तर सरेकडून विल जॅकने 26 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांसह 47 धावा केल्या. त्याचा सलामी जोडीदार जेमी स्मिथने 23 चेंडूत 27 धावा केल्या व पहिल्या 7.3 ओव्हरमध्ये 74 धावांची भागीदारी केली. त्यांनतर ओले पोपने सूत्रे आपल्या हाती घेतली व 35 चेंडूत 3 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 52 धावा चोपल्या. त्याला 12 धावा करणारा रोरी बर्न्स आणि 10 चेंडूत 3 षटकारांसह 24 धावा फाटकावणाऱ्या जेमी ओव्हरटनची मदत मिळाली. रोमांचक सामन्यात सरेने 5 गडी राखून विजय मिळवला. मिडलसेक्सकडून नॅथन सॉउटर 16 धावा देत 2 विकेट्स घेतल्या तर ल्यूक होलम 41 धावा लुटत 2 गडी बाद केले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)