 
                                                                 LSG vs MI: इंडियन प्रीमियर लीगचा (Indian Premier League) 16 वा सामना शुक्रवारी लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात एकाना स्टेडियमवर खेळवण्यात आला. मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना एलएसजीने निर्धारित 20 षटकांत 8 गडी गमावून 203 धावा केल्या. प्रत्युत्तरात, मुंबईला पाच विकेट गमावून फक्त 191 धावा करता आल्या आणि 12 धावांनी पराभव पत्करावा लागला. या हाय व्होल्टेज सामन्यात एक घटना घडली ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. TATA IPL Points Table 2025 Update: लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा पराभव करून नोंदवला दुसरा विजय, येथे पाहा अपडेटेड पॉइंट्स टेबल
ती म्हणजे तिलक वर्मा याला रिटायर आउट करण्यात आले. तो सामन्यात षटकार-चौकार मारू शकली नाही, म्हणून त्याला पॅव्हेलियनमध्ये बोलवण्यात आले. आयपीएलच्या इतिहासात ही पहिलीच घटना नाही, यापूर्वीही तीन वेळा असे घडले आहे.
रिटायर आउट करण्यात आलेले खेळाडू
आर अश्विन विरुद्ध एलएसजी, वानखेडे, 2022
अथर्व तायडे विरुद्ध डीसी, धर्मशाला, 2023
साई सुदर्शन वि एमआय, अहमदाबाद, 2023
तिलक वर्मा विरुद्ध एलएसजी, लखनौ, 2025
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
