SL 123/10 In 15.5 Overs (Target: IND 201/6) | IND vs SL 3rd T20I Live Score Updates: पुणे टी -20 मध्ये भारताचा विजय, मालिकेत 2-0 ने विजयी

आज महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (एमसीए) स्टेडियमवर होणार्‍या तिसर्‍या आणि शेवटच्या टी-20 सामन्यासाठी भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघ आमने-सामने येतील. आज होणाऱ्या या सामन्यात टीम इंडिया विजय मिळवत मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल, तर श्रीलंका मालिकेत बरोबरी करण्याच्या इच्छेने मैदानात उतरेल. 

11 Jan, 03:43 (IST)

भारताने दिलेल्या 202 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेला 123 धावाच करता आल्या. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकांत 6 गडी गमावून 201 धावा केल्या. भारतानाडून नवदीप सैनीने सर्वाधिक 3, वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी 2 आणि जसप्रीत बुमराह याने 1 गडी बाद केला. गोलंदाजांनी पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी करत संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. 

11 Jan, 03:21 (IST)

वॉशिंग्टन सुंदरच्या दुसऱ्या चेंडूवर एंजेलो मॅथ्यूज आउट. सुंदरने बाउंड्री कडे 20 चेंडूत 31 धावा करणाऱ्या मॅथ्यूजला मनीष पांडेकडे कॅच आउट केले. यासह श्रीलंकेचा अर्धा संघ माघारी परतला आहे. श्रीलंकेला विजयासाठी 45 चेंडूत 100 धावांची गरज आहे. 

11 Jan, 02:54 (IST)

नवदीप सैनीने श्रीलंकेला चौथा धक्का दिला. सैनीने यॉर्कर चेंडू टाकत कुशल परेराला बोल्ड केले. त्याने फक्त 5 धावा केल्या.

11 Jan, 02:44 (IST)

जसप्रीत बुमराहच्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर ओशदा फर्नांडो रनआऊट झाला. मनीष पांडेने 2 धावांवर फर्नांडोला धावबाद केले आणि श्रीलंकेला तिसरा झटका दिला.

11 Jan, 02:32 (IST)

शार्दूल ठाकूरने अविष्का फर्नांडोला 6 धावांवर श्रेयस अय्यरकडे कॅच आऊट करत श्रीलंकेला दुसरा धक्का दिला. श्रीलंकेने दुसऱ्या ओव्हरमध्ये दुसरा सलामी फलंदाज गमावला. 

11 Jan, 02:28 (IST)

टीम इंडियाने दिलेल्या 202 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेला पहिल्या ओव्हरच्या अंतिम चेंडूवर पहिला धक्का बसला. जसप्रीत बुमराह ने सलामी फलंदाज दनुष्का गुणथिलाकाला वॉशिंग्टन सुंदर कडे झेलबाद केले. गुणथिलाकाला अंतिम सामन्यात एकच धाव करता आली. 

11 Jan, 02:11 (IST)

श्रीलंकाविरुद्ध टीम इंडिया 3 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा टी-20 सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये खेळला जात आहे. पहिले फलंदाजी करत भारताने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 बाद 201 धावा केल्या आणि श्रीलंकेला विजयासाठी 202 धावांचे विशाल लक्ष्य दिले. भारताकडून राहुलने सर्वाधिक 54 तर धवनने 52 धावा केल्या. लक्षन संदकन याने श्रीलंकेकडून सर्वाधिक 3 गडी बाद केले.

11 Jan, 02:00 (IST)

भारताला एकामागोमान एक दोन धक्के बसले. कर्णधार विराट कोहली रनआऊट झाल्यावर वॉशिंग्टन सुंदरही कॅच आऊट झाला. 18 ओव्हरनंतर भारताचा स्कोर 167/6

11 Jan, 01:59 (IST)

15 षटकांनंतर चार गडी गमावून 138 धावा केल्या. मनीष पांडे 8 तर कर्णधार विराट कोहली संघासाठी 9 धावांवर करत खेळला आहे. केएल राहुल 54, शिखर धवन 52, यष्टीरक्षक संजू सॅमसन 6 आणि श्रेयस अय्यर 4 धावांवर बाद झाले. 

11 Jan, 01:43 (IST)

श्रीलंकेसाठी 14 वी ओव्हर लाहिरू कुमाराने फेकली . लाहिरूच्या या षटकात भारतीय फलंदाजांनी तीन एकेरी आणि एका चौकारच्या मदतीने एकूण सात धावा केल्या. 14 षटकांनंतर संघाची धावसंख्या 130/4 आहे.

11 Jan, 01:38 (IST)

शिखर धवनप्रमाणे सलामी फलंदाज केएल राहुलदेखील अर्धशतक पूर्ण करून बाद झाला. लक्ष्मण संदकनने राहुलला 54 धावांवर माघारी पाठवले. 

11 Jan, 01:34 (IST)

भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहुलने पुण्यातील आतिशीला फलंदाजी करताना 34 चेंडूत फक्त 4 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने आपल्या टी-20 कारकीर्दीतील नववे अर्धशतक पूर्ण केले.

11 Jan, 01:29 (IST)

2015 नंतर पहिला टी-20 सामना खेळणाऱ्या संजू सॅमसनने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला आणि दुसऱ्या चेंडूवर आऊट झाला. वनिंदू हसरंगाने संजूला एलबीडब्ल्यू आऊट करत माघारी धाडले. सॅमसनने 2 चेंडूंचा सामना करत 6 धावा केल्या. 

11 Jan, 01:25 (IST)

10 व्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर भारताला पहिला धक्का बसला. अर्धशतक करणाऱ्या शिखर धवनला लक्षन संदकनने दनुष्का गुणथिलाकाकडे कॅच आऊट केले. धवनने 36 चेंडूत 42 धावा केल्या. 

11 Jan, 01:21 (IST)

टीम इंडियाचा सलामी फलंदाज शिखर धवन याने श्रीलंकाविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यात 10 वे अर्धशतक पूर्ण केले. धवनचे हे 1 वर्षानंतर पहिले टी-20 अर्धशतक आहे. धवनने 34 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान, धवनने 7 चौकार आणि 1 षटकार मारले. 

11 Jan, 01:13 (IST)

अँजेलो मॅथ्यूज नेश्रीलंकेसाठी सातवी ओव्हर टाकली. मॅथ्यूजच्या या षटकात यजमान संघाच्या फलंदाजांनी दोन एकेरी, एक दुहेरी, एक चौकार आणि एका वाईडच्या मदतीने एकूण नऊ धावा फटकावल्या. सात षटकांनंतर संघाची धावसंख्या 72/0, केएल राहुल 31 आणि शिखर धवन 37 धावा करून संघासाठी खेळत आहेत.

11 Jan, 01:02 (IST)

नाणेफेक गमावल्यानंतर यजमान टीम इंडियाने पहिले फलंदाजी करत पॉवर-प्लेमध्ये एकही विकेट न गमावता 63 धावा केल्या. केएल राहुल 30 आणि शिखर धवन 30 धावांवर खेळत आहे. 

11 Jan, 24:54 (IST)

श्रीलंकाविरुद्ध पहिले फलंदाजी करत केएल राहुल आणि शिखर धवनने भारताला वेगवान सुरुवात करून दिली. 4 ओव्हरनंतर टीम इंडियाने 39 धावा केल्या. राहुल आणि धवनने पॉवर-प्लेचा पूर्ण फायदा करून घेत 5 चौकार आणि 1 षटकार लगावला. 

11 Jan, 24:43 (IST)

एंजेलो मॅथ्यूजच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये भारतीय सलामी फलंदाज केएल राहुल आणि शिखर धवन यांनी मोठे चौकार लागले आणि 13 धावा केल्या.

11 Jan, 24:41 (IST)

एंजेलो मॅथ्यूज श्रीलंकासाठी दुसरी ओव्हर टाकण्यासाठी आला. या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर शिखर धवनने मोठा शॉट खेळला. चेंडू जास्त लांब जाऊ शकला, पण दासुन शनाका याला कॅच पकडण्याची संधी होती. चेंडू शनाकाच्या हातून सुटला आणि चौकारासाठी गेला. 

Read more


आज महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (Maharashtra Cricket Association) स्टेडियमवर होणार्‍या तिसर्‍या आणि शेवटच्या टी-20 सामन्यासाठी भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) क्रिकेट संघ आमने-सामने येतील. गुवाहाटी येथे आयोजित पहिला सामना पाऊस आणि ओल्या खेळपट्टीमुळे रद्द करण्यात आला, तर इंदोरमध्ये खेळल्या गेलेल्या दुसर्‍या सामन्यात भारताने एकतर्फी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. आज आता पुणेच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात टीम इंडिया विजय मिळवत मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. टीम इंडियाने मागील सामन्यात चांगला खेळ केला होता. यामध्ये भारताने बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगमधील कामगिरीने सर्वांना प्रभावित केले. श्रीलंकाविरुद्ध टीम इंडियाने जर आजचा सामना जिंकला तर तो त्यांचा लंकेविरुद्ध 13 टी-20 विजय असेल, जो कि कोणत्याही देशाविरुद्ध भारताचा सर्वाधिक विजय असेल. (मॅचचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)

दुसरीकडे, हा सामना जिंकून श्रीलंका मालिकेत बरोबरी करण्याच्या इच्छेने मैदानात उतरेल. दुसर्‍या सामन्यात भारतासाठी सर्व काही चांगले असताना श्रीलंकेला प्रत्येक विभागात अडचणींना सामोरे जावे लागले. भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला मोठी धावसंख्या करू दिली नाही, त्यामध्ये वेगवान गोलंदाज नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर यांनी मुख्य भूमिका बजावली. मात्र, श्रीलंकाने पुणेमधील खेळलेल्या भारतविरुद्ध मागील टी-20 सामन्यात विजय मिळवला होता, त्यामुळे आजदेखील तसाच खेळ करण्याच्या श्रीलंका प्रयत्नात असेल.

असा आहे भारत-श्रीलंका संघ

भारत: विराट कोहली (कॅप्टन), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, संजू सैमसन, रिषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर.

श्रीलंका: लसिथ मलिंगा (कॅप्टन), कुसल परेरा, दनुष्का गुणथिलाका, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे, ओशदा फर्नांडो, दासुन शनाका, अँजेलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, कुसल मेंडिस, वनिंदू हसरंगा, लक्षन संदकन, धनंजया डी सिल्वा, लाहिरू कुमारा, इसुरु उदाना.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement