IND vs NZ 1st ODI Highlights: टीम इंडियाविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात न्यूझीलंड 4 विकेटने विजयी
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेचा पहिला सामना आतापासून काही मिनिटांनी हॅमिल्टनच्या सेडन पार्क स्टेडियमवर खेळला जाईल. दोन्ही संघ वनडे मालिकेची सुरुवात विजयासह करू इच्छित आहेत.
टीम इंडियाविरुद्ध 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात यजमान न्यूझीलंड संघाने 4 विकेटने विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. भारताने दिलेल्या 347 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत किवी संघाने रॉस टेलर याचे शतक, हेन्री निकोल्स आणि कर्णधार टॉम लाथम यांच्या अर्धशतकाच्या जोरावर विजय मिळवला.
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात हॅमिल्टनच्या सेडान पार्क स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या कीवी संघाने 40 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी गमावून 292 धावा केल्या आहेत. रॉस टेलर सध्या 93 आणि कर्णधार टॉम लाथम 62 धावा करून खेळत आहे. विजयासाठी अद्याप संघाला 61 चेंडूंत 60 धावांची आवश्यकता आहे.
कुलदीप यादव ने 34 वी ओव्हर टाकली आणि टॉम लाथमने षटकातील तिसर्या चेंडूवर षटकार खेचला न्यूझीलंडची धावसंख्या 200 वर आणली. रॉस टेलर आणि टॉम लाथम यांनी 43 चेंडूत 62 धावांची भागीदारी केली आणि 37 ओव्हरनंतर किवी संघाने 3 गडी गमावून 250 धावा पूर्ण केल्या. न्यूझीलंडला 78 चेंडूत अजून 98 धावा करायच्या आहेत. टेलर 73 आणि लाथम 41 धावा करून खेळत आहे.
न्यूझीलंडच्या संघाला विजयासाठी 8.82 च्या धावांच्या दराने धावा करण्याची आवश्यकता आहे, मात्र सध्या ते केवळ 5.77 च्या दराने धावा करत आहेत. लाथम आणि टेलर मोठी भागीदारी करण्याचा प्रयत्न करीत आहेत पण त्यांना धावांचा वेगही वाढवावा लागणार आहे. न्यूझीलंडला विजयासाठी 107 चेंडूत अजून 159 धावांची गरज आहे.
भारताने पहिले फलंदाजी करत दिलेल्या 348 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात किवी सलामी फलंदाज हेन्री निकोल्स शतकाच्या जवळ पोहचला आहे. निकोल्स सध्या 77 धावा करून खेळत आहे. न्यूझीलंडने 26 ओव्हरयामध्ये 2 विकेट्स गमवून 156 धावा केल्या. रॉस टेलर 26 धावा करून निकोल्सला साथ देत आहे.
भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने 9 धावांच्या वैयक्तिक धावांवर कीवी फलंदाज टॉम ब्लंडलला बाद करून टीम इंडियाला दुसरे यश मिळवून दिले. ब्लंडलने 10 चेंडूंचा सामना करत एक चौकार ठोकला.
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भारताला पहिले यश मिळाले. शार्दूल ठाकूरने किवी सलामी फलंदाज मार्टिन गप्टिलला थर्ड मॅन केदार जाधवकडे कॅच आऊट केले. गप्टिलने आज 41 चेंडूत 32 धावा केल्या. यात एक चौकाराचाही समावेश आहे.
टीम इंडियाने पहिले बॅटिंग करत न्यूझीलंडला धावांचे लक्ष्य दिले. याच्या प्रत्युत्तरात किवी संघाने पहिल्या 10 ओव्हरमध्ये एकही गडी न गमावता 54 धावा केल्या. मार्टिन गप्टिल 16 आणि हेन्री निकोल्स 31 धावा करून खेळत आहे.
टीम इंडियाने दिलेल्या 348 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत न्यूझीलंड डावाची सुरुवात झाली आहे. किवी संघाकडून मार्टिन गप्टिल आणि हेन्री निकोल्स यांनी डावाची सुरुवात केली. चार ओव्हरनंतर यजमान संघाने एकही विकेट न गमावता 23 धावा केल्या. गप्टिल 6 आणि निकोल्स 10 धावा करून खेळत आहे.
किवी संघाचा कर्णधार टॉम लाथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. अशा प्रकारे भारताने पहिले फलंदाजी केली आणि निर्धारित 50 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 347 धावा केल्या आणि यजमान संघाला पहिला वनडे जिंकण्यासाठी 348 धावांचे लक्ष्य दिले. पहिले फलंदाजी करत टीम इंडियासाठी चौथ्या स्थानावर आलेल्या श्रेयस अय्यर याने शतकी कामगिरी केली.
श्रेयस अय्यरने 101 बॉलमध्ये पहिले एकदिवसीय शतक पूर्ण केले. मात्र, तो 103 धावांवर बाद झाला. श्रेयसने केएल राहुल सह शतकी भागीदारी करत भारताचा डाव सर्वाला आणि संघाला मोठ्या धावसंख्येकडे नेले.
केएल राहुलने 42 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर एकच धावा काढून आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर याच ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर श्रेयस अय्यरने वनडे कारकिर्दीतील पहिले शहतक ठोकले. श्रेयसने शतकी डावात 11 चौकार आणि 1 षटकार मारला. दोघांत 93 चेंडूत 131 धावांची भागीदारी केली झाली आहे.
38 वी ओव्हर न्यूझीलंडकडून वेगवान गोलंदाज टीम साऊथीने टाकली. साऊथीच्या या ओव्हरमध्ये भारतीय फलंदाजांनी दोन षटकार आणि दोन एकेरीच्या मदतीने एकूण 14 धावा केल्या. 38 षटकांनंतर तीन गडी गमावून संघाची धावसंख्या 234 धावा आहे.
36 व्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर केएल राहुलने एक धाव घेतली आणि यश भारताच्या २०० धावा पूर्ण झाल्या. राहुल 25 आणि श्रेयस अय्यर 59 धावा करून खेळत आहे. टीम इंडियाने पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल आणि विराट कोहलीच्या रूपात तीन विकेट्स गमावल्या आहेत.
न्यूझीलंडकडून फिरकी गोलंदाज ईश सोधीने 33 वे ओव्हर टाकली. ईश सोधीच्या या षटकात भारतीय फलंदाजांनी पाच एकेरींच्या मदतीने एकूण पाच धावा केल्या. 33 षटकांनंतर तीन गडी गमावून संघाची धावसंख्या 177 धावा आहे.
भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेचा पहिला सामना आतापासून काही मिनिटांनी हॅमिल्टनच्या सेडन पार्क (Seddon Park) स्टेडियमवर खेळला जाईल. दोन्ही संघ वनडे मालिकेची सुरुवात विजयासह करू इच्छित आहेत. एकीकडे टीम इंडिया टी-20 मालिकेतील लय कायम ठेवू इच्छित असेल, तर दुसरीकडे टी-20 मालिकेतील पराभव विसरून पुढे जाण्याकडे कीवी संघ लक्ष केंद्रित करेल. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताने न्यूझीलंडचा 5-0 ने क्लीन स्वीप केला होता. टी-20 मालिकेत भारताने उत्कृष्ट कामगिरी केली होती. संघाच्या फलंदाजीपासून ते गोलंदाजीपर्यंत सर्व काही ठीक होते. न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेत टीम इंडियात काही बदल दिसून येऊ शकतात. नवीन सलामी जोडीपासून एक नवीन गोलंदाज या मालिकेतील आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये पदार्पण करू शकतात.
भारताची नियमित सलामी जोडी रोहित शर्मा-शिखर धवन नसल्याने त्यांच्या जागी स्थान मिळालेले पृथ्वी शॉ आणि मयंक अग्रवाल डावाची सुरुवात करतील. किवी दौऱ्याआधी धवनला आणि पाचव्या टी-20 सामन्यात रोहित दुसखापत झाल्याने धवनच्या जागी पृथ्वी आणि रोहितच्या जागी मयंकला संधी देण्यात आली आहे. तर, नवदीप सैनी त्याचा पहिला वनडे सामना खेळू शकतो. दुसरीकडे, नियमित किवी कर्णधार केन विल्यमसन यालाही दुखापतीमुळे पहिल्या दोन सामन्यांसाठी बाहेर करण्यात आले आहे. विल्यमसनच्या अनुपस्थितीत टॉम लाथम संघाचे नेतृत्व करेल. (सामन्याचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)