IND vs AUS 3rd ODI Highlights: भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 विकेटने विजय, मालिकेत 2-1 ने विजयी
भारत आणि ऑस्ट्रेलियामधील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना रविवारी बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर थोड्याच वेळात सुरु होईल. आज दोन्ही संघ मालिका जिंकण्याच्या उद्देशाने अंतिम सामन्यात दाखल होतील. या दोघांमध्ये आतापर्यंत 11 द्विपक्षीय मालिका खेळल्या गेल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतील तिसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाने 7 विकेटने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 287 लक्ष्याच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाने सलामी फलंदाज रोहित शर्मा याचे शतक आणि कर्णधार विराट कोहली याच्या 89 धावांच्या खेळीच्या मदतीने विजयाची नोंद केली. बेंगळुरूमधील सामन्यात रोहितने सर्वाधिक 119, तर विराट धावा करून नाबाद परतला. मनीष पांडे आणि श्रेयस अय्यर अय्यरने अनुक्रमे नाबाद 8 आणि 44 धावा केल्या. केएल राहुलने 27 चेंडूत 19 धावांचे योगदान दिले.
ऑस्ट्रेलियाने दिलेले 287 धावांच्या लक्ष्यासमोर यजमान संघाने 42 षटकांच्या अखेरीस दोन गडी गमावून 235 धावा केल्या आहेत. कर्णधार विराट कोहली 76 आणि श्रेयस अय्यर 13 धावा करुन खेळत आहेत. विजयासाठी अद्याप संघाला 49 चेंडूत 52 धावांची गरज आहे.
अॅडम झांपाने भारताला दुसरा झटका दिला. फलंदाज रोहित शर्मा तुफान शतकी खेळ केल्यावर मिशेल स्टार्ककडे झांपाच्या चेंडूवर कॅच आऊट झाला. रोहितने आज 127 चेंडूंचा सामना करत 8 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 119 धावा केल्या.
भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपल्या वनडे कारकिर्दीतील 57 वे अर्धशतक पूर्ण केले आहे. कोहली सध्या 61 चेंडूत चार चौकारांच्या मदतीने 52 धावा करून खेळत आहे.
टीम इंडियाचा सलामी फलंदाज आणि उपकर्णधार रोहित शर्मा ने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात 110 चेंडूत शतक पूर्ण केले. रोहितचे वनडेमधील 29 वे तर, ऑस्ट्रेलियाविरुद्ध हे 8 वे शतक आहे. रोहितने आज शतकी खेळी दरम्यान 8 चौकार आणि 5 षटकार मारले. या शतकासह रोहितने कर्णधार विराट कोहलीची बरोबरी केली. विराट आणि रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकूण आठ शतकं केली आहे.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 287 धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघाने 20.3 ओव्हरमध्ये 100 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 69, तर विराट कोहली 12 धावा करून खेळत आहे. दोघांनी 45 चेंडूत 27 धावा केल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 287 धावांच्या प्रत्युत्तरात फलांजी करत रोहित शर्माने 44 वे वनडे अर्धशतक पूर्ण केले. रोहितने 56 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले.
अॅश्टन अगरने भारताला 13 व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर पहिला धक्का दिला. अगरने टीम इंडियाचा सलामी फलंदाज केएल राहुलला एलबीडब्ल्यू आऊट केले आणि संघाला 69 धावांवर पहिला धक्का दिला. राहुलने आज 27 चेंडूंचा सामना करत 2 चौकाराच्या मदतीने 19 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाने दिलेले 287 धावांच्या उद्घाटनाला उत्तर देताना भारतीय संघाने 8.1षटकांत कोणतेही नुकसान न करता 52 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा 36 आणि लोकेश राहुल 10 धावा करून खेळत आहेत.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 287 धावांच्या प्रत्युत्तरात भारताची सुरुवात चांगली झाली आहे. 6 ओव्हरमध्ये भारताने एकही विकेट न गमावता 39 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा 25 आणि केएल राहुल 8 धावांवर खेळत आहे.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 287 धावांच्या प्रत्युत्तरात रोहित शर्मासोबत केएल राहुलने भारताच्या केली. ऑस्ट्रेलियाच्या डावादरम्यान फिल्डिंग करताना शिखर धवनच्या डाव्या खांद्याला दुखापत झाल्याने धवनला मैदानावर नेण्यात आले.
टीम इंडियाविरुद्ध अंतिम सामन्यात टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 9 बाद 286 धावा केल्या. बेंगळुरूमधील आजचा सामना जिंकून मालिका जिंकण्यासाठी भारताला 287 धावा करण्याचे ऑस्ट्रेलियाने लक्ष्य दिले आहे. ऑस्ट्रेलियाकडून माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ याने एकाकी झुंज देत शतकी कामगिरी केली. स्मिथ 131 धावा करून बाद झाला. टीम इंडियाकडून मोहम्मद शमी याने4, रवींद्र जडेजाने 2, तर नवदीप सैनी आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
48 व्या षटकात दोन विकेट घेऊन मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यापासून रोखले. ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर त्याने षटकार मारण्याच्या प्रयत्नात असलेल्या स्टिव्ह स्मिथला कॅच आऊट केले, त्यानंतर त्याने चौथ्या चेंडूवर पॅट कमिन्सला बाद केले.
स्टीव्ह स्मिथने 44 व्या ओव्हरमधील तिसर्या चेंडूवर आपले शतक पूर्ण केले. स्मिथच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे नववे शतक आहे, तर भारतात तो पहिल्यांदा 100 धावा करण्यास सक्षम झाला आहे. स्मिथने 117 चेंडूत शतक पूर्ण केले असून त्यात 11 चौकारांचा समावेश आहे. स्मिथच्या शतकानंतर ऑस्ट्रेलियाने सहावी विकेट गमावली. अॅश्टन टर्नरला नवदीप सैनीने केएल राहुलकडे कॅच आऊट केले. टर्नरने 10 चेंडूंचा सामना करत 4 धावा केल्या.
बेंगळुरूमधील सामन्यात ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ पॅव्हिलिअनमध्ये परतला आहे. आणि स्टिव्ह स्मिथने वनडेतील वे शतक पूर्ण केले. दुसऱ्या सामन्यात त्याचे शतक दोन धावांनी हुकले असले तरीही आज बेंगळुरूमध्ये स्मितने 117 चेंडूंचा सामना करत शतक पूर्ण केले. स्मिथने या खेळी दरम्यान 11 चौकार मारले. स्मिथचे भारताविरुद्ध हे तिसरे शतक आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथने वनडे कारकिरीतीतील 4000 धावा पूर्ण धावा पूर्ण केल्या. भारतविरुद्ध वनडे मालिकेत स्मिथने दुसऱ्या आणि आता तिसऱ्या सामन्यात प्रभावी कामगिरी केली. स्मिथ भारत विरुद्ध मालिकेतील पहिल्या शतकाच्या जवळ पोहचला आहे. स्मिथ 94 धावा करून खेळत आहे.
ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या दरम्यान भारताचा सलामी फलंदाज शिखर धवनला दुखापत झाली आहे. त्याला सध्या एक्स-रे काढण्यासाठी नेले आहे आणि त्याच्या खेळण्यासाठी उपलब्धतेवर अनिश्चितता निर्माण झाली आहे.
भारतीय संघाचा स्टार गोलंदाज रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मिशेल स्टार्कला शून्यावर परतवून भारतीय संघाला चौथे यश मिळवून दिले. स्टार्कने दोन चेंडूंचा सामना केला.
ऑस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज मार्नस लाबूशेन पाच चौकारांच्या मदतीने 64 चेंडूंत 54धावा काढून बाद झाला. रवींद्र जडेजाच्या चेंडूवर कर्णधार विराट कोहलीने लाबूशेनचा उडता कॅच पकडत भारताला तिसरे यश मिळवून दिले.
टीम इंडियाविरुद्ध टॉस जिंकून पहिले बॅटिंग करत मार्नस लाबूशेन ने वनडे कारकिर्दीतील पहिले अर्धशतक पूर्ण केली. लाबूशेनने 60 चेंडूत 5 चौकार मारत अर्धशतक साजरे केले.
भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) मधील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना रविवारी बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर (M Chinnaswamy Stadium) थोड्याच वेळात सुरु होईल. पहिल्या सामन्यात लाजीरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाने राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या दुसर्या वनडे सामन्यात जोरदार पुनरागमन केले आणि मालिका 1-1 ने बरोबरीत केली. आणि आज दोन्ही संघ मालिका जिंकण्याच्या उद्देशाने अंतिम सामन्यात दाखल होतील. या दोघांमध्ये आतापर्यंत 11 द्विपक्षीय मालिका खेळल्या गेल्या आहेत. यात टीम इंडियाने 5 सामन्यात विजय मिळवला आहे, तर 6 मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारत-ऑस्ट्रेलियाने अखेरची मालिका मार्च 2019 मध्ये खेळली होती, ज्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 3-2 ने विजय मिळवला होता. या मालिकेतील पहिला सामना मुंबईत खेळला गेला होता ज्यात ऑस्ट्रेलियाने 10 विकेट्सने विक्रमी विजय मिळवला होता. राजकोट येथे खेळल्या गेलेल्या दुसर्या वनडे सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली आणि ऑस्ट्रेलियाला 36 धावांनी पराभूत करून मालिकेत बरोबरी साधली. (मॅचचा लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा)
निर्णायक सामन्याआधी भारतीय संघासाठी चिंतेची बाब म्हणजे टीमचे सलामी फलंदाज शिखर धवन आणि रोहित शर्मा यांना मागील सामन्यात झालेली दुखापत. टीम इंडियाचे दोन्ही सलामी फलंदाज आजचा सामना खेळणार कि नाही यावर टॉस दरम्यान कळेल. अन्य ठिकाणी कोणताही बदल संभवत नाही. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाच्या प्लेयिंग इलेव्हनमधेही मागील सामान्यापासून बदल होण्याची संभावना नाही आहे. त्यांची सलामी फलंदाज डेविड वॉर्नर आणि कर्णधार आरोन फिंच चांगल्या फॉर्ममध्ये आहे, स्टिव्ह स्मिथ आणि डेब्यू डाव खेळणारा मार्नस लाबूशेन यांनी प्रभावी डाव खेळला होता आणि भारतीय गोलंदाजांसमोर आव्हान निर्माण केले होते. मात्र, गोलंदाजांना पुढाकार घेत नियमितपणे विकेट काढणे आवश्यक आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)