
List of Cricketers Who Retired in 2025: 2025 हे क्रिकेट विश्वात मोठ्या घडामोडी आणणारे वर्ष ठरले आहे. रोहित शर्मानंतर विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर टॉप क्रिकेटपटूंनी त्यामागे रांग लावलेली दिसत (Cricketers Retired in 2025) आहे. ही यादी आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) 12 मे रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. विराटने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर खेळाच्या सर्वात लांब फॉरमॅट कसोटीमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. त्याच्या निवृत्तीसह, कसोटी क्रिकेटमधून भारतीय दिग्गजांचे पलायन सुरूच आहे. रविचंद्रन अश्विनने डिसेंबरमध्ये आणि रोहित शर्माने गेल्या महिन्यात या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती.
निवृत्ती घेणाऱ्या टॉप क्रिकेटपटूंची यादी
विराटने इंस्टाग्रामवर पोस्टमध्ये म्हटले होते की, "कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा बॅगी ब्लू जर्सी घालून 14 वर्षे झाली आहेत. प्रामाणिकपणे सांगायचे तर, या फॉरमॅटमध्ये मी चांगली कामगिरी करू शकेन याची कल्पना केली नव्हती. त्याने माझी परीक्षा घेतली, मला आकार दिला आणि मी आयुष्यभर माझ्यासोबत घेऊन जाईन असे धडे दिले." पोस्टमध्ये पुढे म्हटले होते की, "या फॉरमॅटपासून दूर जाणे सोपे नाही परंतु ते योग्य वाटते. मी क्रिकेटसाठी माझे सर्वस्व दिले आहे आणि त्याने मला माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त दिले आहे."