KXIP vs RR, IPL 2020: क्रिस गेलचा नाद खुळा! टी-20 क्रिकेटमध्ये 1000 षटकार मारणारा ठरला पहिला फलंदाज, एका धावाने शतक हुकल्यावर दिली अशी प्रतिक्रिया

गेलने चौकार-षटकारांचा पाऊस पडला आणि 7व्या आयपीएल शतकाच्या जवळ पोहचला असताना जोफ्रा आर्चरने त्याला क्लीन बोल्ड करून माघारी धाडलं. बाद झाल्यावर गेलच्या प्रतिक्रियेने सर्वांचे लक्ष वेधले कारण ती पूर्णपणे अनपेक्षित होती.

क्रिस गेल, किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स (Photo Credit: PTI)

KXIP vs RR, IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाबचा (Kings XI Punjab) फलंदाज क्रिस गेल (Chris Gayle) टी-20 क्रिकेटमध्ये 1000 षटकार ठोकणारा पहिला खेळाडू ठरला. किंग्स इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यातील आजच्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने टॉस जिंकून पंजाबला पहिले फलंदाजी करण्यास सांगितले. अशा स्थितीत पंजाबसाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत 'युनिव्हर्स बॉस' (Universe Boss) म्हणून प्रसिद्ध असलेल्या गेलने 63 चेंडूत 99 धावांचा तुफानी खेळ करत 185 धावांपर्यंत मजल मारून दिली. यामध्ये 6 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता. गेल सुरुवातीपासून चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता आणि चौकार-षटकार ठोकत होता. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Dubai International Cricket Stadium) गेलने चौकार-षटकारांचा पाऊस पडला आणि 7व्या आयपीएल शतकाच्या जवळ पोहचला असताना जोफ्रा आर्चरने (Jofra Archer) त्याला क्लीन बोल्ड करून माघारी धाडलं. बाद झाल्यावर गेलच्या प्रतिक्रियेने सर्वांचे लक्ष वेधले कारण ती पूर्णपणे अनपेक्षित होती. (KXIP vs RR, IPL 2020: जोफ्रा आर्चरच्या चेंडूवर बेन स्टोक्सने पकडला मनदीप सिंहचा अफलातून कॅच, सह खेळाडूही पाहून झाले चकित Watch Video)

टी -20 क्रिकेटमध्ये 1000 षटकार ठोकणारा इतिहासातील पहिला फलंदाज म्हणून गेलने डावादरम्यान एक विशाल विक्रमाची नोंद केली. होय, टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारानाचा विक्रम आता गेलच्या नावावर आहे जो कदाचितच पुढे मोडला जाईल. गेलच्या मागे दुसऱ्या स्थानावर त्याचा वेस्ट इंडिजचा सहकारी किरोन पोलार्ड आहे ज्याने 690 षटकार ठोकले आहेत. दुसरीकडे, गेल आजच्या सामन्यात आयपीएलमधील आपले सातवे शतक पूर्ण करेल असे दिसत असताना आर्चरने त्याला 99 धावांवर माघारी धाडलं. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर सहा शतकं आहेत आणि लीगच्या इतिहासात दोनदा 99 धावांवर बाद झालेल्या एकमेव खेळाडू आहे. एका धावाने शतक हुकल्यावर गेलला संताप अनावर झाला आणि त्याने रागात मैदानावरच बॅट फेकली. पाहा व्हिडिओ:

किंग्स इलेव्हनच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्पर्धेत उशीरा सामील झालेला गेल या हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याच्या प्रवेशानंतर किंग्ज इलेव्हन पंजाब पूर्णपणे वेगळी बाजू ठरली आहे कारण ‘युनिव्हर्स बॉस’ ने संघाला सलग पाच विजय मिळवून दिले आहेत. यामुळे पंजाबने आयपीएलच्या पॉईंट्स टेबलवर चौथे स्थान मिळवले आहे.