KXIP vs RR, IPL 2020: आयपीएल (IPL) 2020 च्या 50व्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबचा (Kings XI Punjab) सामना राजस्थान रॉयल्सशी (Rajasthan Royals) होत आहे. पंजाब आणि राजस्थान यांच्यातील रोमांचकारी सामन्यात पंजाबने नाणेफेक गमावून पहिले फलंदाजी केली. मयंक अग्रवालच्या अनुपस्थितीत कर्णधार केएल राहूलसह युवा फलंदाज मनदीप सिंह (Mandeep Singh) सलामीला आला. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सामन्यात पंजाबकडून मनदीपने अर्धशतकी खेळी केली होती, पण राजस्थान रॉयल्सविरुद्ध आजच्या सामन्यात तो अपयशी ठरला आणि भोपळाही न फोडता माघारी परतला. जोफ्रा आर्चरने (Jofra Archer) रॉयल्सकडून गोलंदाजीची सुरुवात केली आणि पहिल्या ओव्हरच्या अंतिम चेंडूवर संघाला पहिले यश मिळवून दिले. आर्चरने किंग्स इलेव्हन पंजाबला ओव्हरच्या अंतिम चेंडूवर मनदीपला कॅच आऊट करून माघारी धाडलं. (KXIP vs RR, IPL 2020: क्रिस गेलचा तडाखा! 'युनिव्हर्स बॉस'च्या 99 धावांच्या वादळी खेळीने किंग्स इलेव्हनचे RR समोर 186 धावांचं तंगड आव्हान)
आर्चरने टाकलेला बाउन्सर बॉल योग्य ठिकाणी टप्पा खाल्ल्यानंतर मनदीपच्या तोंडाकडे जात होता. धोकादायक चेंडूपासून बचाव करताना मनदीपची बॅट चेंडूला लागली ज्यानंतर ऑफ साईडवर उभे असलेल्या राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू बेन स्टोक्सने पुढच्या बाजूला उडी मारत अफलातून झेल पकडला. स्टोक्सच्या या शानदार कॅचनंतर चकित झालेले त्याचे साथीदारही टाळ्या वाजवून त्याचे जल्लोष करू लागले. पाहा व्हिडिओ:
WATCH - Jofra's snorter, Stokes' scorcher
What a combination to get the first wicket. Beauty of a ball from @JofraArcher and a superb catch from @benstokes38.https://t.co/dQpbDVErjL #Dream11IPL #KXIPvRR
— IndianPremierLeague (@IPL) October 30, 2020
दुसरीकडे, आजच्या सामन्यात पहिले फलंदाजी करताना पंजाबने धडाकेबाज क्रिस गेलच्या 99 धावांच्या तुफानी खेळीच्या जोरावर 185 धावांपर्यंत मजल मारली. गेलने आजच्या सामन्यात स्पर्धेतील तिसरे अर्धशतक ठोकले आणि संघाला मजबूत धावसंख्येकडे नेले. गेल वगळता कर्णधार केएल राहुलने 46, तर निकोलस पूरनने 10 चेंडूत 22 धावांचे योगदान दिले. ग्लेन मॅक्सवेल नाबाद 6 आणि दीपक हुडा नाबाद 1 धाव करून परतला.