KXIP vs MI, IPL 2020 Live Streaming: किंग्स इलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर
या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Hotstar अॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. रिलायन्स जिओ ]आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात.
इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) 13 व्या सामन्यात आज किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात टक्कर होणार आहे. पंजाब आणि मुंबई टीममधील आजचा सामना अबू धाबीच्या शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. दोन्ही टीमने आजवर प्रत्येकी एक सामना जिंकले आहेत, तर 2 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. भारतीय वेळेनुसार आज, 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता टॉस होणार असून सामना 7.30 वाजता सुरु होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Disney+ Hotstar अॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात. (IPL 2020: झहीर खान याची युएईमधील मराठमोळी शाळा, मुंबई इंडियन्सच्या दिग्विजय देशमुखला मराठीतून देतोय गोलंदाजीचे धडे Watch Video)
दोन्ही टीमच्या आयपीएलमधील आजवरच्या प्रवासाबद्दल बोलायचे झाले तर दोन्ही टीमने पराभवाने मोसमाची सुरुवात केली. मुंबई इंडियन्सला एकीकडे सीएसकेकडून पराभव पत्करावा लागला, तर दिल्ली कॅपिटल्सने पंजाबचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात दोन्ही टीम लयीत आले, पण हाय-स्कोअरिंगच्या तिसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे, आता दोन्ही टीम आजच्या सामन्यात जबरदस्त खेळ करून विजयी रुळावर परतण्याच्या प्रयत्नात असतील. दरम्यान, गुणतालिकेत पंजाब 5व्या तर मुंबई सहाव्या स्थानावर विराजमान आहे.
किंग्स इलेव्हन पंजाब टीम: केएल राहुल (कॅप्टन), करुण नायर, मोहम्मद शमी, निकोलस पूरन, मुजीब उर रहमान, क्रिस गेल, मनदीप सिंह, मयंक अग्रवाल, हार्डस विल्जॉईन, दर्शन नालकंडे, सरफराज खान, अर्शदीप सिंह, हरप्रीत ब्रार, मुरुगन अश्विन, के गौतम, जे सुचीथ, ग्लेन मॅक्सवेल, शेल्टन कॉटरेल, दीपक हुड्डा, ईशान पोरेल, रवि बिश्नोई, जेम्स नीशाम, क्रिस जॉर्डन, तेजिंदर ढिल्लन आणि प्रभसिमरन सिंह.
मुंबई इंडियन्स टीम: रोहित शर्मा (कॅप्टन), क्विंटन डी कॉक, राहुल चाहर, हार्दिक पांड्या, ईशान किशन, जेम्स पॅटिसन, जसप्रीत बुमराह, किरोन पोलार्ड, कृणाल पांड्या, मिशेल मॅकक्लेनाघन, आदित्य तारे, क्रिस लिन, धवल कुलकर्णी, सौरभ तिवारी, शेरेफान रदरफोर्ड, नॅथन कूल्टर-नाईल, ट्रेंट बोल्ट, सूर्यकुमार यादव, अनमोलप्रीत सिंह, अनुकुल रॉय, दिग्विजय देशमुख, जयंत यादव, मोहसीन खान, प्रिन्स बलवंत राय.