KWK 6 Controversy: हार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांना लोकपालकडून नोटीस

के. जैन यांनी हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांना नोटीस बजावली आहे.

KL Rahul, Hardik Pandya and Karan Johar (Photo Credits: Twitter)

कॉफी विथ करणच्या (Koffee With Karan) सीझन सहामध्ये वादग्रस्त वक्तव्यामुळे हार्दिक पांड्या (Hardik Pandya ) आणि के.एल राहुल (KL Rahul) हे दोन भारतीय खेळाडू अडचणीमध्ये आले आहेत. सध्या या दोन्ही खेळाडूंवरील बंदी काढली आहे. पण त्यांच्यावरील आरोपांची चौकशी अजूनही सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या लोकपालांकडून या दोन्ही खेळाडूंची चौकशी सुरू आहे. सध्या लोकपाल निवृत्त डी. के. जैन यांनी हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांना नोटीस बजावली आहे.

प्रशासकीय समितीने हार्दिक पांड्या आणि के एल राहुल यांचे निलंबन तात्पुरते रद्द केले आहे. सध्या लोकपालांकडून निकालापूर्वीच बंदी उठवण्यात आली आहे. यामध्ये जैन यांनी दोन्ही खेळाडूंना साक्षीसाठी हजर राहण्याबाबत नोटिस पाठवली आहे. मात्र याविषयी बीसीसीआय आणि खेळाडूंमध्ये बोलणं झालं आहे की नाही याची माहिती मिळू शकलेली नाही.Koffee With Karan 6 मधील हार्दिक पांड्या आणि केएल राहुल यांच्या बेताल विधान वादावर करण जोहरची प्रतिक्रीया

सध्या हार्दिक पांड्या मुंबई इंडियंस तर के एल राहुल किंग्स इलेव्हन पंजाब संघाडून आयपीएलमध्ये खेळत आहे. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू सुनावणीसाठी कधी हजर होणार हे अद्याप समजू शकलेले नाही. साक्ष द्यायला कधी यायचे याचा निर्णय खेळाडूंनी घ्यावा असेही जैन यांनी स्पष्ट केले.