Pandya Brothers Father Passes Away: कृणाल व हार्दिक पांड्यावर वडिलांच्या मृत्यूने दुःखाचा डोंगर कोसळला, बरोडा कर्णधाराची सय्यद मुश्ताक स्पर्धेतून माघार

भारतीय खेळाडूंच्या वडिलांचे पांड्या बंधूंच्या वडिलांचे निधन झाल्याचे समजले जात आहे. देशाच्या घरगुती टी-20 स्पर्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळणाऱ्या बरोडा संघाचा कर्णधार कृणालने या दुःखद माहितीनंतर अशा क्षणी कुटुंबासोबत राहण्यासाठी स्पर्धेतून माघार घेतली.

हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या (Photo Credit: Instagram)

भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि क्रिकेटर भाऊ कृणाल (Krunal Pandya) यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. भारतीय खेळाडूंच्या वडिलांचे पांड्या बंधूंच्या वडिलांचे निधन झाल्याचे समजले जात आहे. देशाच्या घरगुती टी-20 स्पर्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (Syed Mushtaq Ali Trophy) खेळणाऱ्या बडोदा (Baroda)संघाचा कर्णधार कृणालने या दुःखद माहितीनंतर अशा क्षणी कुटुंबासोबत राहण्यासाठी स्पर्धेतून माघार घेतली. क्रुणालने वडोदरामध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी तयार केलेला बायो-बबल सोडला आहे. बडोदा क्रिकेट असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर हट्टांगडी यांनी एएनआयला सांगितले की, "हो, क्रुणाल पांड्याने बबल सोडके आहे. ही वैयक्तिक शोकांतिका आहे, हार्दिक आणि क्रुणालच्या या दुःखाबद्दल बडोदा क्रिकेट असोसिएशनने शोक व्यक्त करते." चालू असलेल्या सय्यद मुश्ताक स्पर्धेत क्रुणाल आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत ज्यात बरोडा संघाने विजय मिळवला आहे. (Syed Mushtaq Ali Trophy 2021: कर्णधार कृणाल पांड्यावर शिवीगाळ करण्याचा आरोप, बडोदाचा हा खेळाडू स्पर्धेतून पडला बाहेर)

बरोदा संघाचे नेतृत्व करत कृणालने तीन सामन्यात 4 गडी बाद केले. उत्तराखंडविरुद्ध स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात क्रुणालने बरोदासाठी 76 धावाही केल्या. पहिले तीन सामने जिंकून बरोदा संघाने एलिट ग्रुप सीमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, हार्दिक पांड्या सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळत नसला तरी इंग्लंडविरुद्ध आगामी व्हाईट बॉल मालिकेसाठी त्याने प्रशिक्षण सुरू केले आहे. दरम्यान, यापूर्वी कृणाल बरोदा संघाचा उपकर्णधार दीपक हुड्डाला अपशब्द करण्याच्या प्रकरणासाठी चर्चेत आला होता. पांड्याशी झालेल्या वादानंतर उपकर्णधार दीपकने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. सामन्यापूर्वी बरोडाच्या रिलायन्स स्टेडियमवर सराव करताना क्रुणाल आणि दीपक यांच्यात भांडण झाले.

दीपकने बीसीसीआयला (BCCI) एक ईमेल लिहून लिहिले की, कृणाल पांड्याने त्याच्याबरोबर शिवीगाळ केली आहे. तसेच आगामी टी-20 स्पर्धेतही तो खेळणार नाही असेही त्याने लिहिले. न्यूज रिपोर्टनुसार, दीपक प्रशिक्षकाच्या परवानगीनेच सराव करीत असतानाअष्टपैलू पांड्याने त्याला त्याला धमकावण्यास सुरूवात केली असल्याचेही दीपकने आपल्या ई-मेलमध्ये लिहिले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif