KKR vs RR IPL 2025 53rd Match Live Toss Update: कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

प्लेऑफच्या शर्यतीचा विचार करता कोलकातासाठी हा सामना जिंकणे खूप महत्वाचे आहे. तर राजस्थान रॉयल्स संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. कोलकाता 10 सामन्यांतून चार विजयांसह पॉइंट टेबलमध्ये सातव्या स्थानावर आहे. तर, राजस्थान रॉयल्स संघ 11 सामन्यांत 3 विजयांसह आठव्या स्थानावर आहे. आता हा सामना कोणता संघ जिंकतो हे पाहणे रंजक ठरेल.

RR vs KKR (Photo Credit - X)

KKR vs RR IPL 2025 53rd Match: आयपीएल 2025 चा 53वा (IPL 2025) सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स (KKR vs RR) यांच्यात कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्लेऑफच्या शर्यतीचा विचार करता कोलकातासाठी हा सामना जिंकणे खूप महत्वाचे आहे. तर राजस्थान रॉयल्स संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. कोलकाता 10 सामन्यांतून चार विजयांसह पॉइंट टेबलमध्ये सातव्या स्थानावर आहे. तर, राजस्थान रॉयल्स संघ 11 सामन्यांत 3 विजयांसह आठव्या स्थानावर आहे. आता हा सामना कोणता संघ जिंकतो हे पाहणे रंजक ठरेल.

पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, रियान पराग (कर्णधार), कुणाल सिंग राठोड, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, युद्धवीर सिंग चरक, आकाश मधवाल

कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), आंगक्रिश रघुवंशी, मोईन अली, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement