क्रिकेटपटू मोहम्मद शमी याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी, 15 दिवसांत कोर्टात हजर होण्याचे आदेश 

कोर्टाने शमी आणि त्याच्या भावाला 15 दिवस ज्यात शरण जाणे आणि जामिनासाठी अर्ज करण्याची मुदत दिली आहे.

मोहम्मद शमी (Photo Credit: Twitter)

भारतीय क्रिकेट संघाचा (Indian Team) वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याच्या विरुद्ध कलकत्ता कोर्टाने अटक वॉरंट जरी केला आहे. कोर्टाने शमी आणि त्याचा भाऊ हसीन अहमद याला आत्मसमर्पण करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. 2018 मध्ये मोहम्मद शमीवर त्याची पत्नी हसीन जहां (Hasin Jahan) ने मारहाण, बलात्कार आणि हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे गंभीर आरोप केले होते. शमी आणि त्याचा भाऊ यांच्यावर आयपीसी कलम 498 ए अंतर्गत घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सगळ्या प्रकरणी हसीन जहाँनं शमी विरोधात गुन्हा दाखल केला होता.

शमी सध्या वेस्ट इंडीजविरुद्ध दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना खेळत आहे आणि 2019 च्या क्रिकेट विश्वचषकात भारताने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. सध्या शमी विंडीज दौऱ्यावर असल्याने त्याला तातडीनं भारतात येण्याची विनंती करण्यात आली आहे. शमीचे पत्नी हसीन जहाँ हिनं शमी आणि त्याच्या कुटुंबीयांवर हत्येचा आरोप केला होता. तसेच शमीचे इतर महिलांशी अनैतिक संबंध असल्याचंही हसीन जहाने म्हटलं होतं. आता कोलकाता न्यायालयानं शमी विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.

2018 मध्ये हसीनने शमीचे फेसुबक आणि व्हॉट्स अँप चॅटही प्रसारमाध्यमांसमोर आणले होते. शमीचे इतर महिलांसोबत अनैतिक संबंध आहेत असाही आरोप हसीनने केला होता. नंतर, हसीनने शमीच्या कुटुंबीयांविरुद्ध देखील हुंड्यासाठी कौटुंबिक हिंसाचार करण्यात आला असा आरोप तिने केला होता. हसीनने शम्मीविरुद्ध विवाहबाह्य संबंध ठेवल्याचा, घरगुती हिंसाचार, बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्यासोबतच अनेक गंभीर आरोप केले आहेत. हसीनने शम्मी मॅच फिक्सिंगमध्येही सामील असल्याची शक्यता व्यक्त केली होती.