Coronavirus मुळे घरी अडकलेले क्रिकेटपटू स्वत:ला व्यस्त ठेवण्यासाठी काय करीत आहेत? जाणून घ्या
आगामी काळात कोणतेही क्रिकेट नसल्याने खेळाडू स्वत:ला व्यस्त ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. क्रिकेटर्स आजकाल स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी काय करतात ते पाहूया.
संपूर्ण क्रिकेटींग कॅलेंडर कोरोना व्हायरसचा (Coronavirus) सर्व देशभर परिणाम झाला आहे ज्याचा संपूर्ण जगाला फटका बसला आहे. विषाणूने आतापर्यंत 7,000 हून अधिक लोकांचा बाली घेतला आहे आणि जगभरातील जवळपास 175,000 लोकांना याची लागण झाली आहे. एका वर्षात अनेक देश-विदेशातील क्रीडा कार्यक्रम आयोजित होत असताना साथीच्या रोगाचा जगभरातील स्पर्धांवर परिणाम झाला आहे. क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर, सर्व प्रमुख द्विपक्षीय मालिका स्थगित केल्या असून पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super Leaguea) आणि इंडियन प्रीमियर लीगसारख्या (Indian Premier League) राष्ट्रीय टी-20 लीगही या व्हायरसमुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 29 मार्चपासून सुरु होणारं आयपीएल 15 एप्रिलपर्यंत स्थगित केले आहे, तर पीएसएलमधील सेमीफायनल आणि फायनल सामना शिल्लक असताना स्पर्धा पुढे ढकलली आहे. (COVID-19: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सचिन तेंडुलकर, पीव्ही सिंधू, सानिया मिर्झा समवेत दिग्गजांनी स्वीकारले WHO चे #SafeHands चॅलेंज, पाहा Videos)
गेल्या आठवड्यात भारत-दक्षिण आफ्रिका बोर्डानंतर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेच्या पहिल्या सामन्यानंतर उर्वरित सामने स्थगित केले होते, तसेच दक्षिण आफ्रिकेविरूद्ध भारताची एकदिवसीय मालिकाही पुढे ढकलण्यात आली. इंग्लंडचा श्रीलंका दौराही रद्द करण्यात आला आणि इंग्लंडची टीम घरी परतली. आगामी काळात कोणतेही क्रिकेट नसल्याने खेळाडू स्वत:ला व्यस्त ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. क्रिकेटर्स आजकाल स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी काय करतात ते पाहूया:
शिखर धवन
केएल राहुल
आंद्रे रसेल
View this post on Instagram
Thanks for coming #bugs @kennarlewis69 am the #champ 🤣🤣🤣🤣🤣
A post shared by Andre Russell🇯🇲 Dre Russ.🏏 (@ar12russell) on
क्रिस गेल
View this post on Instagram
Smile 😊 and give your face a rest. 🙏🏿
A post shared by KingGayle 👑 (@chrisgayle333) on
बेन स्टोक्स
View this post on Instagram
Athletics coach yesterday Golf coach today 🏃♂️ 🏌️♂️ ⛳️
A post shared by Ben Stokes (@stokesy) on
इरफान पठान
View this post on Instagram
Some free time due to #corona... no worries let’s make some videos #acting #kasam se
A post shared by Irfan Pathan (@irfanpathan_official) on
यातील बहुतेक स्टार्स इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या आगामी आवृत्तीत खेळणार आहेत. आयपीएलची सुरुवात तारीख कोरोना व्हायरसच्या धमकीमुळे 29 एप्रिलपासून 15 एप्रिलपर्यंत ढकलण्यात आली आहे. शनिवारी आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीनंतर मुंबईत पत्रकारांशी बोलताना बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणालेः "15 दिवस तरीही असतील. आयपीएलचे सामने कमी करावा लागतील. ते किती छोटे होतील हे मी सांगू शकत नाही." भारत-दक्षिण आफ्रिका तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका रद्द आणि आयपीएल पुढे ढकलण्याच्या निर्णयाच्या दुसर्याच दिवसानंतर गांगुलीने सुरक्षा ही त्यांची प्राथमिकता असल्याचे पुन्हा सांगितले.