KKR IPL 2021: पाचव्या पराभवानंतर Kolkata Knight Riders संघातून होऊ शकते दिग्गजांची हकालपट्टी, ‘या’ नव्या चेहऱ्यांना संधीची शक्यता
आयपीएलच्या 14 व्या मोसमातील सात सामन्यात केकेआरला पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अशास्थितीत मागील काही सामन्यात कामगिरी करण्या अपयशी ठरलेल्या आंद्रे रसेल, सुनील नारायण आणि दिनेश कार्तिक यांना डच्चू दिला जाऊ शकतो.
KKR IPL 2021: इयन मॉर्गनच्या (Eoin Morgan) नेतृत्वातील कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघासाठी यंदाच्या आयपीएलमध्ये सर्व काही योजनेनुसार जाताना दिसत नाही आहे. आयपीएलच्या (IPL) 14 व्या मोसमातील सात सामन्यात केकेआरला (KKR) पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. कोलकाताने यंदाच्या सीजनमध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स विरोधात विजय मिळवला आहे. तथापि, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या मागील सामन्यात नाईट रायडर्सकडून विशेषतः आघाडीच्या फलंदाजांकडून आक्रमक फलंदाजीत कमतरता दिसली. ज्याचा उल्लेख खुद्द संघाचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनीही केला. त्यामुळे, संघात आता उर्वरित सामन्यांसाठी काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची मोठी शक्यता आहे ज्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत. (IPL 2021: ‘संघनिवडीवेळी खेळाडू म्हणून तुम्हाला स्वातंत्र्य व विश्वास दिला जातो’, KKR च्या कामगिरीवर नाराज Brendon McCullum यांनी दिले बदलाचे संकेत)
कोलकाताचा आगामी सामना 2 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरोधात होणार आहे. बेंगलोर सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे आणि त्यांना टक्कर देण्यासाठी नाईट रायडर्सना एका मजबूत प्लेइंग इलेव्हनची गरज आहे. अशास्थितीत मागील काही सामन्यात कामगिरी करण्या अपयशी ठरलेल्या आंद्रे रसेल (Andre Russell), सुनील नारायण (Sunil Narine) आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) यांना डच्चू दिला जाऊ शकतो. आघाडीची फळी फ्लॉप ठरल्यावर हे तिघे संघाचा डाव सावरण्याचा अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या जागी लोकी फर्ग्युसन, टिम सेफर्ट आणि रिंकू सिंह यांना मधल्या फळीत संधी मिळू शकते. फर्ग्युसनने मागील वर्षी युएईमध्ये चेंडूने प्रभावित केले होते तर सेफर्ट विकेटकिपिंग व बॅटिंगने मजबूत करू शकतो. शिवाय, आघाडीच्या फळीत नितीश राणा, शुभमन गिल यांनी देखील निराशनजक कामगिरी केली असली तरी संघ व्यवस्थान त्यांना एक संधी देऊ शकते. मात्र आघाडीच्या फळीत करुण नायरच्या रूपात एक पर्याय उपलब्ध आहे.
केकेआरचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन: इयन मॉर्गन (कॅप्टन), शुभमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, रिंकू सिंह, लोकी फर्ग्युसन, टिम सेफर्ट, पॅट कमिन्स, शिवम मावी, वरुण चक्रवर्ती आणि प्रसिद्ध कृष्णा.