IPL Auction 2025 Live

Joe Root on Sachin Tendulkar Records: माझे लक्ष सध्या... सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याच्या प्रश्नावर जो रुटचे मोठे वक्तव्य

सचिन तेंडुलकरच्या नावावर 15921 धावा आहेत, तर जो रूटच्या नावावर 12377 धावा आहेत. जो रुट ज्या वेगाने धावा करत आहे, ते पाहता इंग्लंडचा हा फलंदाज लवकरच सचिनचा विक्रम मोडेल असे बोलले जात आहे.

Joe Root (Photo Credit - X)

मुंबई: इंग्लंडचा महान फलंदाज जो रूट (Joe Root) हा लॉर्ड्स कसोटीत 34 वे शतक झळकावून आपल्या देशासाठी कसोटीत सर्वाधिक शतके करणारा फलंदाज ठरला आहे. कसोटीत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत जो रूट सचिन तेंडुलकरपेक्षा (Sachin Tendulkar) 3544 धावांनी मागे आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर 15921 धावा आहेत, तर जो रूटच्या नावावर 12377 धावा आहेत. जो रुट ज्या वेगाने धावा करत आहे, ते पाहता इंग्लंडचा हा फलंदाज लवकरच सचिनचा विक्रम मोडेल असे बोलले जात आहे. लॉर्ड्सवर शतक झळकावल्यानंतर खुद्द जो रूटने याचे उत्तर दिले आहे. (हे देखील वाचा: Most Hundred In WTC: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक शतक झळकवणारे टाॅप 5 फलंदाज, यादीत फक्त एकच भारतीय खेळाडू)

काय म्हणाला जो रुट?

लॉर्ड्स कसोटीतील त्याच्या 34व्या शतकानंतर, जेव्हा जो रुटला विचारण्यात आले की तो सचिनच्या विक्रमाच्या जवळ आला आहे आणि त्याची नजर सचिन तेंडुलकरच्या विक्रमावर आहे का, तेव्हा जो रूट म्हणाला, मला फक्त माझ्या संघासाठी खेळायचे आहे योगदान देऊ इच्छितो आणि जास्तीत जास्त धावा करू इच्छितो. शतक झळकावणं ही खूप छान भावना असते. तो म्हणाला, कसोटीत संघाच्या विजयापेक्षा महत्त्वाचे दुसरे काहीही नाही आणि माझे लक्ष संघासाठी शक्य तेवढे योगदान देण्यावर आहे. इंग्लंडच्या फलंदाजाने सांगितले की, या मानसिकतेमुळे भविष्यातही चांगले निकाल मिळतील अशी आशा आहे.

जो रूटने लॉर्ड्सवर केले अनेक मोठे विक्रम 

इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूटने लॉर्ड्स कसोटीत 34वे शतक झळकावून श्रीलंकेविरुद्ध केवळ संघाला विजयाच्या जवळ आणले नाही तर अनेक मोठे विक्रमही नष्ट केले आहेत. त्याने लॉर्ड्सवर सातवे शतक झळकावले, असे करणारा तो पहिला फलंदाज आहे. जो रूटच्या आधी ग्रॅहम गूच आणि मायकेल वॉन यांनी लॉर्ड्सवर प्रत्येकी सहा शतके झळकावली होती. जो रूटने लॉर्ड्स कसोटीच्या दोन्ही डावात शतक झळकावले, अशी कामगिरी करणारा तो जगातील चौथा खेळाडू आहे, रूटच्या आधी जॉर्ज हॅडली, ग्रॅहम गूच आणि मायकेल वॉन यांनी हा पराक्रम केला होता.

जो रूटने कारकिर्दीत प्रथमच कसोटी सामन्यात दोन शतके झळकावण्याचा पराक्रम केला आहे. ग्रॅहम गूचला मागे टाकत जो रूट लॉर्ड्सवर सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. याशिवाय जो रूटने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सर्वात जलद शतक ठोकले, त्याने 111 चेंडूत आपले शतक पूर्ण केले.