IPL Auction 2025 Live

न्यूझीलंडच्या जेम्स निशम याला पाकिस्तानी अभिनेत्रीने दिली लग्नाची ऑफर, भारतीय चाहत्यांची प्रतिक्रिया पाहून काय म्हणाली पहा...

त्याने केलेल्या एका ट्विटवर पाकिस्तान टीव्ही अभिनेत्रीने अशी प्रतिक्रिया दिली आहे की ज्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. निशामला पाकिस्तानी अभिनेत्रीने ट्विटरवर चक्क लग्न करण्याची ऑफर दिली आहे. सेहरचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यानंतर सेहरने एक ट्विट करत भारतीय चाहत्यांवर निशाणा साधला आहे.

(Photo by Mike Hewitt/Getty Images)

न्यूझीलंडचा (New Zealand) अष्टपैलू जेम्स निशम (James Neesham) नेहमीच चर्चेत राहिला आहे. त्याचे चर्चेत राहण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याचे सोशल मीडियामध्येही अ‍ॅक्टिव्ह राहणे. तो सोशल मीडियामध्ये खूप अ‍ॅक्टिव आहे. दरम्यान, त्याने केलेल्या एका ट्विटवर पाकिस्तान टीव्ही अभिनेत्रीने अशी प्रतिक्रिया दिली आहे की ज्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. निशामला पाकिस्तानी अभिनेत्रीने ट्विटरवर चक्क लग्न करण्याची ऑफर दिली आहे. पाकिस्तान टीव्ही अभिनेत्री सेहर शिनवारी (Sehar Shinwari) यांनी निशामच्या एका ट्विटवर प्रतिक्रिया देत म्हणाली की, "जिमी मी तुझ्यावर प्रेम करते." शेनवारी इथेच नाही थांबली, तिने पुन्हा थोड्या वेळाने ट्वीट केले आणि लिहिले, "तुला माझ्या भावी मुलांचा बाप व्हायला आवडेल?" (SL vs NZ T20I: न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेसाठी श्रीलंका संघ जाहीर; लसिथ मलिंगा कर्णधार, थिसारा परेरा याला डच्चू)

नीशमने तिच्या या ट्विटला प्रत्युत्तर दिले आणि तिची ऑफर नाकारली. नीशमने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की बाकी सर्व ठीक आहे, परंतु आपण आपल्या प्रस्तावाच्या शेवटी दिलेली इमोजीची आवश्यक नव्हती. नीशमनेही शेनवारीच्या कमेंटवर प्रत्युत्तर देत लिहिले की, "मला असे वाटते की इमोजी अनावश्यक नव्हती."

निशमची प्रतिक्रिया

दुसरीकडे, सेहरचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यानंतर सेहरने एक ट्विट करत भारतीय चाहत्यांवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट केले की माझ्या प्रस्तावावर नीशम यांनी माझ्या ट्विटवर प्रतिक्रिया काय दिली भारतात जणू काही मिरचीचा वर्षाव झाला आहे. तेथील चाहते जिमीला सांगत आहेत की हिच्यापासून दूर रहा, ती एका अतिरेकी देशाची आहे जणू काय त्याने माझ्याशी लग्न करण्याचे मान्य केले आहे.

जिमी निशम हा न्यूझीलंड संघाचा एक स्फोटक अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने विश्वचषक 2019 मध्ये चमकदार कामगिरी केली आणि आपल्या संघाला फायनलमध्ये नेण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.