Jharkhand High Court Issues Notice to MS Dhoni: आयपीएल 2025 आधी धोनीच्या अडचणी वाढल्या; झारखंड हायकोर्टाने पाठवली नोटीस, काय आहे प्रकरण?

भारतीय क्रिकेटपटूचे जुने व्यावसायिक भागीदार मिहिर दिवाकर आणि सौम्या दास यांनी मिळून धोनीविरुद्ध काउंटर केस दाखल केली आहे.

MS Dhoni (Photo credit: YouTube ANI)

Jharkhand High Court Issues Notice to MS Dhoni: आयपीएल 2025 आधी धोनीच्या अडचणी वाढल्याचे दिसत आहे. झारखंड हायकोर्टाने एमएस धोनीला (MS Dhoni) व्यावसायिक फसवणूक प्रकरणात नोटीस पाठवली (Jharkhand High Court) आहे. भारतचा माजी कर्णधार झोनीचे जुने व्यावसायिक भागीदार मिहिर दिवाकर (Mihir Diwakar) आणि सौम्या दास (Soumya Das) यांनी मिळून धोनीविरुद्ध काउंटर केस दाखल केली आहे. वास्तविक, हे प्रकरण 'अर्का स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड' नावाच्या कंपनीशी संबंधित आहे.

ज्यामध्ये दिवाकर आणि सौम्या संचालक म्हणून पदस्थ होते. यावर्षी जानेवारीमध्ये धोनीने त्याच्या दोन्ही माजी साथीदारांवर संचालकपदावर असताना फसवणूक केल्याचा आरोप केला होता.(eMotorad Electric Cycle Gigafactory: पुण्यात लवकरच सुरु होणार जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक सायकल गिगाफॅक्टरी; MS Dhoni ने केली आहे गुंतवणूक)

अर्का स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट कंपनीने धोनीसोबत करार केला होता की तो 'एमएस धोनी' या नावाने भारतात आणि परदेशात क्रिकेट अकादमी सुरू करणार होते. 5 जानेवारी रोजी धोनीने रांची येथे त्याच्या दोन माजी व्यावसायिक भागीदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला तेव्हा ही बाब चर्चेत आली. धोनी म्हणाला की 2021 मध्ये त्याचा करार संपला होता. तरीही मिहिर दिवाकर आणि सौम्या दास यांनी त्याच्या नावावर क्रिकेट अकादमी सुरू ठेवल्या. यामुळे धोनीने 15 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा केला. (MS Dhoni Viral Photo: चाहत्यांमध्ये कूल अंदाजात दिसला माही, फोटो होत आहे व्हायरल)

धोनीवर काउंटर केस

मिहिर दिवाकर आणि सौम्या दास झारखंड हायकोर्टात रांचीमधील एका खासगी न्यायालयात त्यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी पोहोचले आहेत. या कारणास्तव झारखंड उच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी एमएस धोनीला नोटीस पाठवली आहे. पुढील सुनावणीच्या तारखेबाबत अद्याप कोणतेही अपडेट नाही.

अलीकडे धोनी आयपीएल 2025 मध्ये खेळण्याच्या विषयावर देखील चर्चेत आला होता. त्याला चेन्नई सुपर किंग्सने पुढील हंगामासाठी अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवले आहे, ज्या अंतर्गत त्याला 4 कोटी रुपये मानधन मिळेल. या दिग्गज भारतीय क्रिकेटपटूने अनेक क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. त्यांनी रांचीमध्ये 'माही रेसिडेन्सी' नावाचे हॉटेल उघडले आहे आणि बेंगळुरूमध्ये एमएस धोनी ग्लोबल स्कूलही सुरू केले आहे. याशिवाय त्यांनी अनेक ठिकाणी पैसेही गुंतवले आहेत.