Jay Shah यांनी केली पुन्हा भविष्यवाणी, म्हणाले- Rohit Sharma च्या नेतृत्वाखाली Champions Trophy आणि WTCही जिंकणार (Watch Video)
जय शाहने (Jay Shah) नुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघाच्या कामगिरीचे कौतुक केले आणि रोहितच्या कर्णधारपदाचे समर्थन केले. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघावर टी-20 विश्वचषक जिंकण्याचा विश्वास कसा व्यक्त केला होता आणि त्यांचे म्हणणे योग्य असल्याचे सिद्ध झाले.
मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी एक मोठी घोषणा करताना सांगितले की, रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्याच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) आणि पुढच्या वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये संघाचे नेतृत्व करेल. पुढील वर्षी भारत आयसीसीच्या दोन स्पर्धा जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जय शाहने (Jay Shah) नुकत्याच पार पडलेल्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघाच्या कामगिरीचे कौतुक केले आणि रोहितच्या कर्णधारपदाचे समर्थन केले. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघावर टी-20 विश्वचषक जिंकण्याचा विश्वास कसा व्यक्त केला होता आणि त्यांचे म्हणणे योग्य असल्याचे सिद्ध झाले. शाह म्हणाले की, 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीतील अपयशामुळे भारताला अमेरिका आणि वेस्ट इंडिजने आयोजित केलेल्या टी-20 विश्वचषकात यश मिळवून दिले.
बीसीसीआयने व्हिडिओ केला शेअर
जय शाहने बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सलग 10 सामने जिंकल्यानंतर आम्ही अंतिम फेरीत हरलो. आम्ही मने जिंकली, पण विश्वचषक जिंकू शकलो नाही. मी राजकोटमध्ये म्हटलं होतं की 29 जूनला आपण मन जिंकू, चषक जिंकू आणि बार्बाडोसमध्ये तिरंगा फडकवू. आमच्या कर्णधाराने हे केले. या विजयानंतर आता आमची नजर पुढील दोन आयसीसी स्पर्धा WTC फायनल आणि चॅम्पियन्स ट्रॉफीवर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आमचा संघ पुन्हा चॅम्पियन होईल, असा मला पूर्ण विश्वास आहे.
पाहा व्हिडिओ
हे देखील वाचा: Washington Sundar Milestone: झिम्बाब्वेविरुद्ध वॉशिंग्टन सुंदरची मोठी कामगिरी, टी-20 क्रिकेटमध्ये 100 विकेट केल्या पूर्ण
टी-20 विश्वचषकासाठी जय शाह यांनी केली होती भविष्यवाणी
भारत आणि इंग्लंड यांच्यात फेब्रुवारीमध्ये राजकोटमध्ये खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी जय शाहने हे भाकीत केले होते. वास्तविक, एससीए स्टेडियमचे निरंजन शाह स्टेडियम असे नामकरण करण्याच्या प्रसंगी जय शहा बोलत होते. त्यावेळी ते म्हणाला होता की, 'वर्ल्डकपबाबत माझ्या विधानाची सर्वजण वाट पाहत आहेत. सलग 10 सामने जिंकूनही भारत 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकू शकला नाही, परंतु आम्ही मन जिंकले. मी वचन देतो की 2024 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आम्ही बार्बाडोसमध्ये भारतीय ध्वज रोवू.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)