Jasprit Bumrah ला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरूद्धच्या आगामी सामन्यांमध्ये आराम, मोहम्मद सिराज, सिद्धार्थ कॉल या खेळाडूंचा संघात समावेश

तर न्युझिलंड दौर्‍यातील T20I सामन्यासाठी सिद्धार्थ कॉल या खेळाडूला समविष्ट करण्यात आले आहे.

जसप्रीत बुमराह: (Photo Credit: Twitter)

ऑस्ट्रेलियामधील भारताच्या दमदार कामगिरीमध्ये गोलंदाज जसप्रीत बुमराहचा (Jasprit Bumrah)  देखील मोलाचा वाटा आहे. मात्र ऑस्ट्रेलियातील आगामी एकदिवसीय (ODI series against Australia)  आणि पुढील न्युझिलंड दौर्‍यात (New Zealand Tour)  मात्र जसप्रीत बुमराह याला आराम देण्यात आला आहे. जसप्रीत हा भारतासाठी तारणहार आहे. त्याच्या दमदार खेळीवर भारतीय गोलंदाजीची मदार आहे.

जसप्रीत बुमराहला आराम

ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकल्यानंतर भारत 12 जानेवारीपासून तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. मात्र या सामन्यांमध्ये जसप्रीतऐवजी मोहम्मद सिराज या खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. तर न्युझिलंड दौर्‍यातील T20I सामन्यासाठी सिद्धार्थ कॉल या खेळाडूला समविष्ट करण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मालिकेसाठी भारतीय संघ कसा असेल?

विराट कोहली , रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रविंद्र जाडेजा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, खलिल अहमद, मोहम्मद शमी

न्यूझीलंडविरुद्ध T20I मालिकेसाठी भारतीय संघ कसा असेल?

विराट कोहली , रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, सिद्धार्थ कौल, खलिल अहमद

न्युझिलंड दौर्‍यामध्ये भारतीय संघ 5 वनडे आणि 3 टी20 सामने खेळणार आहे. या दौर्‍यामध्ये महेंद्रसिंग धोनीचाही समावेश होणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif