Janata Curfew: Channai Super Kings संघाचा अनोख्या पद्धतीचा गजर; कर्णधार महेंद्र सिंह धोनी, हरभजन सिंह, केदार जाधव, मुरली विजय यांचा धमाकेदार व्हिडिओ व्हायरल

कोरोना व्हायरसची लागण होऊन भारतात आतापर्यंत 7 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 300 हून अधिक रुग्ण कोरोना बाधीत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज 22 मार्चला जनता कर्फ्यूचे (Janata Curfew) पालन करण्याचे आवाहन केले होते.

भारतात कोरोना व्हायरसने (Coronavirus) धुमाकूळ घातला आहे. कोरोना व्हायरसची लागण होऊन भारतात आतापर्यंत 7 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 300 हून अधिक रुग्ण कोरोना बाधीत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज 22 मार्चला जनता कर्फ्यूचे (Janata Curfew) पालन करण्याचे आवाहन केले होते. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यात राजकीय नेते, बॉलिवूड कलाकार, यांच्यासह सर्वसामन्यांचाही समावेश आहे. यातच आयपीएलमध्ये खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचा (Chanai Super Kings) एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओत कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni), हरभजन सिंह (Harbhajan Singh), केदार जाधव (Kedar Jadhav), आणि मुरली विजय (Murali Vijay) यांनी जनता कर्फ्यूत अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांचे आभार मानले आहेत. हा व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.

करोना व्हायरसमुळे सध्या आयपीएल 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. जर 15 एप्रिलला आयपीएल झाली नाही तर ही स्पर्धा रद्द कावी लागेल. पण यावेळी सर्वच संघ देशाच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत. त्याचमुळे आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू लावला होता. त्याचबरोबर सायंकाळी 5 वाजता आपल्याला मदत करणाऱ्या यंत्रणा, व्यक्तींचे आभार मानण्यासाठी गजर करायला सांगितला होता. त्याला लोकांनीही चांगला प्रतिसाद दिला. दरम्यान, चेन्नईच्या संघाने एक व्हिडीओ आता पोस्ट केला आहे. त्यामध्ये चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी, हरभजन सिंग आणि केदार जाधव दिसत आहेत. हा व्हिडीओ आत्ता केलेला नाही तर आधी शूट केला आहे. पण या व्हिडीओद्वारे आम्हीही मोदी यांच्या घोषणेला प्रतिसाद देत आहोत, हे चेन्नई सुपर किंग्सने दाखवून दिले आहे. हे देखील वाचा- क्रिकेटविश्वात Coronavirus चा शिरकाव; जगात पहिल्यांदा क्रिकेटपटूला कोरोना व्हायरसची लागण

चेन्नई सुपर किंग्ज यांचे ट्वीट-

जनता कर्फ्यूदरम्यान संध्याकाळी मुंबईसह राज्यातील नागरिकांनी करोनाशी लढा देणाऱ्या अत्यावश्यक सेवांमधील सर्व कर्मचाऱ्यांचे शंख, टाळ्या आणि थाळीनाद करून आभार मानले. जनता कर्फ्यूला प्रतिसाद देणाऱ्या महाराष्ट्रवासियांचे आभार व्यक्त करतानाच, जनता कर्फ्यूत उद्या पहाटे पाच वाजेपर्यंत वाढ करण्याचा निर्णयही आरोग्यमंत्री टोपे यांनी जाहीर केला.