IND vs AUS U19 World Cup 2020 Super League QF 1 Live Streaming: भारत अंडर-19 विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंडर-19 विश्वचषक क्वार्टर फायनल लाईव्ह सामना आणि स्कोर पहा Star Sports वर

गट-ए मधील सर्व सामने जिंकलेला भारत अंतिम-8 मध्ये दाखल झाला आहे, जेथे त्यांचा सामना आज ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. इंडिया अंडर-19 आणि ऑस्ट्रेलिया अंडर-19 सामना 28 जानेवारी (मंगळवार) रोजी सेनवेस पार्क, पॉचेफस्टरूममध्ये दुपारी 1:30 वाजता सुरू होईल.

भारत अंडर-19 विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंडर-19 (Photo Credit: Instagram)

गतविजेता भारतीय संघाने (Indian Team) अंडर-19 विश्वचषकाच्या (World Cup) क्वार्टर फायनलमध्ये सहज प्रवेश केला आहे. गट-ए मधील सर्व सामने जिंकलेला भारत अंतिम-8 मध्ये दाखल झाला आहे, जेथे त्यांचा सामना आज ऑस्ट्रेलियाशी (Australia) होणार आहे. भारताने अंडर-19 विश्वचषक स्पर्धा सर्वाधिक चार वेळा जिंकली आहे, तर ऑस्ट्रेलियाने 3 वेळा जिंकली. स्पर्धेचा लीग सामना जवळजवळ संपला असून सुपर क्वार्टर फायनल्स संघ निश्चित झाले आहेत. आधीच क्वार्टर फायनलमध्ये भारतीय अंडर-19 टीमचा सामना ऑस्ट्रेलिया अंडर-19 संघामध्ये होईल. हा सामना सेनवेस पार्क, पॉचेफस्टरूममध्ये खेळला जाईल. वेस्ट इंडीजबरोबरच या स्पर्धेतील दुसरे अपराजित संघ असल्याने भारत खूप आत्मविश्वासासह मैदानात उतरेल. 2018 विश्वचषक फायनलही दोन्ही संघांदरम्यान खेळला गेला होता.

इंडिया अंडर-19 आणि ऑस्ट्रेलिया अंडर-19 सामना 28 जानेवारी (मंगळवार) रोजी सेनवेस पार्क, पॉचेफस्टरूममध्ये दुपारी 1:30 वाजता सुरू होईल. टॉस दुपारी 1:00 वाजता होईल. भारतीय चाहत्यांसाठी हा अंडर-19 वर्ल्ड कप सामना स्टार स्पोर्ट्स 3 वर थेट प्रसारित केला जाईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्क व्यतिरिक्त हा सामना जिओ टीव्ही अ‍ॅपवर थेट पाहता येईल.

ऑस्ट्रेलियाला गटातील तीन सामन्यांपैकी एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला सामना गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने नायजेरिया आणि इंग्लंडला अनुक्रमे 10 आणि 2 विकेटने पराभूत केले. दुसरीकडे, टीम इंडिया लीग सामन्यात अपराजित राहिला. श्रीलंकाविरुद्ध 90 धावांनी विजय मिळवून भारताने त्यांच्या मोहिमेला सुरुवात केली. त्यानंतर जपानविरुद्ध 10 विकेटने विजय मिळवला. आणि अखेरीस पावसाने व्यत्यय आणलेल्या तिसऱ्या सामन्यात डकवर्थ लुईस पद्धतीने न्यूझीलंडला भारताने 44 धावांनी पराभूत केले. यशस्वा जयस्वालने तीन सामन्यांत 145 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. दुसरीकडे, रवी बिश्नोई याने गोलंदाजीने प्रभाव पडला आणि यापुढे भारतीय संघाने विजयी धावा सुरू ठेवावी अशी संघ व्यवस्थापनाची इच्छा असेल. मॅकेन्झी हार्वेचा संघ स्पर्धेतील भारताला पहिल्या पराभवाची चव चाखवण्याच्या प्रयत्नात असेल.

असा आहे भारत-ऑस्ट्रेलिया अंडर-19 संघ

भारत अंडर-19: प्रियम गर्ग (कॅप्टन), आकाश सिंह, अथर्व अंकोलेकर, शुभांग हेगड़े, यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल, कार्तिक त्यागी, कुमार कुशाग्र, सुशांत मिश्रा, विद्याधर पाटिल, रवी बिश्नोई, शाश्वत रावत, दिव्यांश सक्सेना, तिलक वर्मा, सिद्धेश वीर आणि दिव्यांश जोशी.

ऑस्ट्रेलिया अंडर-19: कूपर कॉनोली, ऑलिव्हर डेव्हिस, सॅम फॅनिंग, जेक फ्रेझर-मॅकगर्क, मॅकेन्झी हार्वे (कॅप्टन), लाचलान हर्न, कोरी केली, लियाम मार्शल, टोड मर्फी, पैट्रिक रोवे, तनवीर संघा, लियाम स्कॉट, ब्रॅडली सिम्पसन, कॉनर सुली आणि मॅथ्यू विल्लन्स.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif