‘एमएस धोनी ने रागात बॅट फेकली आणि...’ इरफान पठाण, गौतम गंभीर यांनी सांगितला संतापलेल्या 'कॅप्टन कूल'चा आठवणीतला किस्सा

आयपीएल दरम्यान धोनीने काही प्रसंगी मैदानात उघडपणे आपला संताप व्यक्त केला. चेन्नई सुपर किंग्सचा त्याचा सहकारी दीपक चाहरही त्याच्या रागाचा शिकार बनलेला आहे.

गौतम गंभीर आणि एमएस धोनी (Photo Credit: Getty)

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) त्याच्या शांत स्वभावाची ओळखला जातो. पण मागील काही दिवसात आपण असे अनेक किस्से ऐकले आहेत जेणे करून धोनीलाही राग येतो हे नक्की आहे. कुलदीप यादव, मोहम्मद शमी यांना राष्ट्रीय संघाकडून खेळताना धोनीच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. जग त्याला 'कॅप्टन कूल' (Captain Cool) म्हणून ओळखत असला तरी धोनीबरोबर खेळलेल्या माजी क्रिकेटपटू असा विश्वास करतात की हा माजी भारतीय कर्णधार देखील माणूस आहे आणि काही प्रसंगी त्याने मैदानावर स्वतःवरचा ताबा गमावला आहे. माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि इरफान पठाण (Irfan Pathan) म्हणाले की, यापूर्वी काही प्रसंगी आंतरराष्ट्रीय सामन्या दरम्यान यष्टीरक्षक फलंदाज स्वतःवरचा ताबा गमावला होता. गंभीर म्हणाले, "लोकं म्हणतात की त्यांनी त्याला (धोनी) आपला रागवताना पाहिले नव्हते, परंतु मी ते दोनदा पाहिले आहे. वर्ल्ड कप 2007 आणि दुसर्‍या वर्ल्ड कपचा विषय आहे जेव्हा आम्ही चांगली कामगिरी केली नव्हती." गंभीर म्हणाला, "तो मनुष्यही आहे आणि त्याला प्रतिक्रिया देणे स्वाभाविक आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून (सीएसके) खराब क्षेत्ररक्षण किंवा झेल सोडला, तर तो रागावतो. होय, तो शांत आहे. इतर कर्णधारांच्या तुलनेत तो अत्यंत शांत आहे. नक्कीच माझ्यापेक्षा शांत." (जेव्हा एमएस धोनी याने गमावला स्वतःवरचा ताबा, मोहम्मद शमी याला भर मैदानात सुनावले खडेबोल, जाणून घ्या 'तो' किस्सा)

दुसरीकडे, पठाण म्हणाला, “सराव सामन्यादरम्यान आम्ही सामना खेळला ज्यामध्ये डाव्या हाताच्या फलंदाजांना उजव्या हाताने आणि उजव्या हाताच्या फलंदाजांना डाव्या हाताने फलंदाजी करावी लागली. वॉर्म अपनंतर आम्ही सरावाला जाणार होतो. वॉर्म अपदरम्यान आम्ही दोन संघ तयार केले. धोनी आऊट झाला, पण त्याला तसं वाटलं नाही. तेव्हा त्याने बॅट फेकली आणि ड्रेसिंग रूममध्ये जाऊन आदळआपट केली. सरावासाठीही तो उशिरा आला.

आयपीएल दरम्यान धोनीने काही प्रसंगी मैदानात उघडपणे आपला संताप व्यक्त केला. चेन्नई सुपर किंग्सचा त्याचा सहकारी दीपक चाहरही त्याच्या रागाचा शिकार बनलेला आहे. स्टार स्पोर्ट्स ऑन क्रिकेट कनेक्टेडवर, गंभीर, इरफान आणि ब्रेट ली सारख्या क्रिकेट तज्ज्ञांनी उदाहरणे शेअर केली जातात जेव्हा धोनीने मैदानावर भडकला.