IPL मध्ये वर्णद्वेषाच्या डॅरेन सॅमी याच्या आरोपाचे माजी सहकारी इरफान पठाणने केले खंडन, घरगुती क्रिकेटमधील घटना सामान्य असल्याचे केले मान्य
वेस्ट इंडिज क्रिकेटपटू डॅरेन सॅमीने इंडियन प्रीमिअर लीगमध्येही (आयपील) वर्णद्वेषाचा अनुभव आल्याचे सांगितलं होतं. त्यावर त्याचा हैदराबाद संघातील माजी सहकारी पार्थिव पटेल आणि इरफान पठाण यांनी सॅमीचा दावा फेटाळून लावला.
आफ्रिकन-अमेरिकन जॉर्ज फ्लॉयड याच्या मृत्यूनंतर वर्णद्वेषाचा (Racism) मुद्दा मागील काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे. वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू क्रिस गेल, डॅरेन सॅमी (Darren Sammy) यांनीही या प्रकरणावर आपबिती सांगितली. ICC ने या विरोधात भूमिका घेण्याचं सॅमीने आवाहन केलं होतं. सॅमी आणि गेलने आपल्याला खेळत असताना अनेकदा वर्णद्वेषाचा सामना करावा लागल्याचंही जाहीर केलं होतं. त्यानंतर सॅमीने इंडियन प्रीमिअर लीगमध्येही (IPL) वर्णद्वेषाचा अनुभव आल्याचे सांगितलं होतं. त्यावर त्याचा हैदराबाद संघातील माजी सहकारी पार्थिव पटेल आणि इरफान पठाण (Irfan Pathan) यांनी यावर आपले मत व्यक्त केलं. 2013 आणि 2014 मध्ये आयपीएल टीम सनरायझर्स हैदराबादकडून (Sunrisers Hyderabad) खेळताना त्यालाही वर्णद्वेषाचा सामना करावा लागला असल्याचं सॅमी म्हणाला. पण त्याच्या माजी सहकारी-पार्थिव, इरफान आणि वेणुगोपाल राव यांनी सॅमीचा दावा फेटाळून लावला. (George Floyd Death: डॅरेन सॅमी याची वर्णद्वेषाच्या मुद्द्यावरून ICC कडे मागणी, क्रिकेट मंडळांनीही केले आवाहन)
विकेटकीपर-फलंदाज पार्थिवने रविवारी सांगितले की, “मला असे वाटत नाही की मी हे (अपमानकारक) शब्द कोणी वापरलेले ऐकले असेल.” आंध्र क्रिकेट असोसिएशनचे संचालक वेणुगोपाल म्हणाले, “मला खात्री नाही... मला याची कल्पना नाही.” मात्र, घरगुती क्रिकेटमध्ये अशा घटना असामान्य असल्याचं इरफानने कबूल केले. “मी सॅमीसोबत 2014 साली एकाच संघातून IPL खेळलो आहे. जर सॅमीसोबत तसा प्रसंग घडला असता, तर त्यावर नक्कीच मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली असती. पण त्याच्यासोबत असं काही घडल्याचं मला तरी काही आठवत नाही, कारण अशी कुठलीही चर्चाच झाली नाही. परंतु आपल्याला आपल्या लोकांना शिक्षित करण्याची आवश्यकता आहे कारण मी वर्णद्वेष घरगुती क्रिकेटमध्ये पाहिले आहे. दक्षिणेकडील आपल्या काही क्रिकेटपटूंना, विशेषत: देशाच्या उत्तर आणि पश्चिम भागात मला सामोरे जावे लागले. मला कोणाचे नाव घ्यायचे नाही.”
इरफान म्हणाला, "जे घडते ते प्रेक्षकांमध्ये असते, कोणीतरी जेस्टरसारखे वागण्याचा प्रयत्न करतात. लोकं वर्णद्वेषी आहेत म्हणून नाही, परंतु असे वाटते की एखाद्याने काही प्रसंगी मर्यादा ओलांडून काहीतरी मजेदार सांगून लोकप्रिय होण्याचा प्रयत्न केला,” पठाण म्हणाले. दरम्यान, सॅमीच्या विधानावर बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की,“सॅमीला काही तक्रारी असल्यास त्या वेळी तक्रार कळवायला हवे होते. जर त्याला हवे असेल तर तो अजूनही औपचारिक तक्रार देऊ शकतो आणि गरज पडल्यास मंडळ चौकशी करू शकेल.”
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)