IPL Auction 2025 Live

Ireland vs South Africa 2nd ODI 2024 Live Streaming: दुसऱ्या वनडेमध्ये आयर्लंड दक्षिण आफ्रिकेला देणार कडवी टक्कर; थेट सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?

तथापि, फॅनकॉड मालिकेतील सर्व सामने त्याच्या ॲप आणि वेबसाइटवर ऑनलाइन पाहता येणार आहे.

Photo Credits: X

Ireland vs South Africa 2nd ODI 2024 Live Streaming:   4 ऑक्टोबर रोजी खेळवला जात आहे. हा सामना अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर पार पडत आहे. टी 20 मालिकेत दोन्ही संघांमध्ये विजयासाठी मोठी चुरस पहायला मिळाली होती. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने आयर्लंडचा 8 गडी राखून पराभव केला होता. तर दुसऱ्या सामन्यात आयर्लंडने दमदार पुनरागमन करत आफ्रिकेचा 10 धावांनी पराभव केला होता. यादरम्यान, दोन सामन्यांची टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली. तर पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने आयर्लंडवर 139 धावांनी मोठा विजय साकारला होता. यामुळे आजच्या सामन्यात आयर्लंड कमबॅक करेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  (हेही वाचा -  Canada vs Oman 6th T20 Tri-Series 2024 Scorecard: T20 मध्ये कॅनडाने चमकदार कामगिरी करून केला ओमानचा पराभव , येथे पाहा CAN vs OMA सामन्याचे स्कोअरकार्ड )

आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला वनडे किती वाजता सुरू होईल?

आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना 2 ऑक्टोबर रोजी अबू धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5 वाजता सुरू होईल. तर टॉसची वेळ अर्धा तास आधी असेल.

थेट सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा

आयर्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिकेचे थेट प्रक्षेपण भारतात टीव्हीवर उपलब्ध होणार नाही. तथापि, फॅनकॉड मालिकेतील सर्व सामने त्याच्या ॲप आणि वेबसाइटवर ऑनलाइन पाहता येणार आहे. अशा परिस्थितीत तेथून पहिल्या वनडे सामन्याचा आनंद घेता येईल.

दोन्ही संघांचे खेळाडू

आयर्लंड संघ: अँड्र्यू बालबर्नी, पॉल स्टर्लिंग (कर्णधार), कर्टिस कॅम्फर, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (विकेटकीपर), जॉर्ज डॉकरेल, मार्क अडायर, अँडी मॅकब्राईन, क्रेग यंग, ​​फिओन हँड, ग्रॅहम ह्यूम, मॅथ्यू हम्फ्रेस, गेविन होई, नील रॉक, स्टीफन डोहेनी

दक्षिण आफ्रिका संघ: टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी झोर्झी, रायन रिकेल्टन, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, ट्रिस्टन स्टब्स, काइल व्हेरेने (विकेटकीपर), विआन मुल्डर, अँडिले फेहलुक्वायो, ब्योर्न फोर्टुइन, न्काबा पीटर, लुंगी नगिअर्ट बादी, ओके, ओके बर्जर, जेसन स्मिथ, लिझाद विल्यम्स