IPL: आयपीएलमध्ये या 5 खेळाडूंनी कर्णधार म्हणून ठोकली आहे शतके, यादीत भारतीय खेळाडूंचा दबदबा

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) फलंदाजांना दरवर्षी शतकेही पहिले गेले आहे पण भारतीय कर्णधाराने आयपीएलमध्ये शतक झळकावताना ते फारच कमी वेळा झाले असते. अशास्थितीत आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून शतके करणाऱ्या खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे आहे.

संजू सॅमसन आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

IPL: टी-20 फॉरमॅटमध्ये शतक ठोकणे नेहमीच मोठी कामगिरी मानली गेली आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) फलंदाजांना दरवर्षी शतकेही पहिले गेले आहे पण भारतीय कर्णधाराने आयपीएलमध्ये (IPL) शतक झळकावताना ते फारच कमी वेळा झाले असते. देश-विदेशात क्रिकेट चाहते सध्या इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या सीजनचा आनंद लूटत आहेत. आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये भारतीय खेळाडूंची बॅट बरसली आणि खेळाडूंनी धावांचा जोरदार पाऊस पाडला आहे. केरळचा 26 वर्षीय युवा खेळाडू संजू सॅमसन (Sanju Samson) आयपीएलमध्ये कर्णधारपदाची पदार्पणाच्या सामन्यात शतकी खेळी करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. सॅमसनने 119 धावांची शानदार शतकी खेळी केली आणि पहिल्याच सामन्यात धावा लुटल्या. सॅमसनची शानदार खेळी पाहून क्रिकेटविश्वात सध्या त्याचे खूप कौतुक होत आहे. अशास्थितीत आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून शतके करणाऱ्या खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे आहे. (IPL 2021 च्या सुरुवातीच्या सामन्यांत ‘या’ भारतीय युवा खेळाडूंनी केले चाहत्यांच्या मनावर राज्य, टीम इंडियामध्ये ठोकू शकतात दावा)

1. विराट कोहली (Virat Kohli)

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली या यादीत अव्वल स्थानावर येतो. रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार विराट कोहली कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये पाच शतके ठोकणारा खेळाडू आहे. कोहलीने 2016 आयपीएलमध्ये आरसीबी संघाचे नेतृत्व करत 4 शतकांचा कारनामा केला होता. याखेरीज 2019 च्या मोसमात देखील कोहलीने 100 धावांचा टप्पा पार केला होता.

2. एडम गिलक्रिस्ट (Adam Gilchrist)

ऑस्ट्रेलियाचे माजी महान खेळाडू अ‍ॅडम गिलक्रिस्ट यांचे आहे. 2011 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळतगिलक्रिस्ट यांनी शतक झळकावले होते. या सामन्यात गिलक्रिस्टने 55 चेंडूत 106 धावांची शतकी खेळी केली होती. शिवाय त्यांनी या प्रतिष्ठित लीगमध्ये 80 डावांमध्ये 27.2 च्या सरासरीने 2069 धावा केल्या कसून त्यांच्या नावावर दोन शतक आणि 11 अर्धशतके आहेत.

3. केएल राहुल (KL Rahul)

या यादीतील तिसरे मोठे नाव भारतीय संघाचा प्रतिभावान खेळाडू केएल राहुलचे आहे. आयपीएल 2020 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध किंग्स XI पंजाबचे (आता पंजाब किंग्ज) नेतृत्व करताना राहुलने 69 चेंडूंत नाबाद 132 धावांचे स्फोटक शतक ठोकले होते. राहुलने आपल्या शानदार खेळीदरम्यान 14 चौकार आणि सात षटकार लगावले.

4. संजु सैमसन (Sanju Samson)

या यादीत चौथे नाव राजस्थान रॉयल्सचा युवा कर्णधार संजू सॅमसनचे येते. आयपीएल 2021 च्या पहिल्या सामन्यात राजस्थानचे नेतृत्व करताना सॅमसनने 119 धावांचे शानदार शतक झळकावले होते. सॅमसनने आपल्या सर्वोत्तम डावात 63 चेंडूंचा सामना करत 12 चौकार आणि सात षटकार ठोकले.

5. वीरेंद्र सेहवाग (Virender Sehwag)

भारताचे माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने आयपीएल 2011 मध्ये डेक्कन चार्जर्सविरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्स (सध्या दिल्ली कॅपिटल्स)कडून कर्णधारपदी असताना खेळताना शतक ठोकले होते. या सामन्यात सेहवागने 119 धावांची शानदार खेळी केली होती. सेहवागने आपल्या शानदार खेळी दरम्यान 56 चेंडूंचा सामना करत 13 चौकार व 6 षटकार देखील ठोकले होते.