IPL 2022 मध्ये ‘हे’ युवा स्टार्स पदार्पण करण्यासाठी सज्ज, ‘बेबी AB’ ते विश्वविजेता कर्णधार दाखवणार जलवा
अशा परिस्थितीत एकीकडे टी-20 क्रिकेटच्या धुरंधर खेळाडूंवर सर्वांची नजर असताना खालील युवा खेळाडू देखील आपला जलवा दाखवण्यासाठी आतुर असतील.
Young Debutants in IPL 2022: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 च्या महा लिलावात यावर्षी होणाऱ्या टी-20 लीगमध्ये प्रथमच सहभागी होण्यासाठी संघांनी अनेक दमदार खेळाडूंची निवड केली. यातील काहींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला आहे, तर काही या वर्षी झालेल्या अंडर-19 विश्वचषकात चमकले. आयपीएलचा (IPL) 15 वा हंगाम चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सलामीच्या सामन्याने सुरु होईल. आयपीएल 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) पासून भारताच्या यश धुल (Yash Dhull) असे काही आश्वासक युवा खेळाडू पदार्पण करण्यासाठी सज्ज असून सध्या बड्या-बड्या खेळाडू आणि प्रशिक्षकांसह जोरदार तयारी करत आहेत. अशा परिस्थितीत एकीकडे टी-20 क्रिकेटच्या धुरंधर खेळाडूंवर सर्वांची नजर असताना खालील युवा खेळाडू देखील आपला जलवा दाखवण्यासाठी आतुर असतील. (IPL 2022 Pitch-Report: मुंबई-पुणे सामन्यादरम्यान अशी कसेल खेळपट्टी, फलंदाज की गोलंदाज, पाहा कोणाला फायदेशीर ठरेल मैदान? जाणून घ्या पीच रिपोर्ट)
यश धुल (Yash Dhull)
टीम इंडियाचा अंडर 19 वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार याच्यावर देखील या आयपीएलमध्ये सर्वांचे नजर असेल. या युवा फलंदाजाला दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतले आहे. धुलने रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण करताना दोन शतके झळकावून स्वत:ला सिद्ध केले. तसेच अंडर-19 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतही त्याने शतक झळकावले होते.
अभिनव मनोहर (Abhinav Manohar)
कर्नाटकच्या अनुभव मनोहरसाठीही हे आयपीएल खूप महत्त्वाचे आहे. 27 वर्षीय फलंदाज फटकेबाजीसाठी ओळखला जातो. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही त्याने महत्त्वपूर्ण खेळी केली असून गुजरात टायटन्सने त्याच्यावर 2.60 कोटी रुपयांचा डाव खेळला आहे.
डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis)
त्याच्या स्ट्रोक खेळण्याच्या कौशल्यासाठी ‘बेबी एबीडी’ म्हणून प्रसिद्ध दक्षिण आफ्रिकेचा डेवाल्ड ब्रेविस उजव्या हाताचा फलंदाज आणि एक पार्टटाइम लेग-ब्रेक गोलंदाज आहे. विस्तृत शॉट्स खेळण्यासाठी ओळखला जाणाऱ्या आणि अंडर-19 विश्वचषकात 506 धावांची विक्रमी खेळी केलेल्या ब्रेविसला आयपीएल 2022 च्या लिलावात पाच वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सने खरेदी केले.
राजवर्धन हंगरगेकर (Rajvardhan Hangargekar)
मूळचा महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील हंगरगेकर गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जकडून मैदानात उतरेल. हांगरगेकर एक मध्यमगती गोलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज असून त्याने या वर्षाच्या सुरुवातीला भारताच्या विजयी अंडर 19 विश्वचषक मोहिमेत आपल्या षटकार मारण्याच्या पराक्रमाने सर्वांना प्रभावित केले होते.
रोवमन पॉवेल (Rovman Powell)
वेस्ट इंडिजचा पॉवेल त्याच्या झंझावाती फलंदाजीसाठी ओळखला जातो. या वर्षी जानेवारीमध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेत शतक झळकावले होते. दिल्ली कॅपिटल्सने त्याला 2.80 कोटीत खरेदी केले असून विंडीजचा हा धडाकेबाज दिल्लीसाठी फिनिशरची भूमिका बजावू शकतो. तसेच मध्यम गोलंदाजी त्याला लहान फॉरमॅटच्या खेळात महत्त्वाचा खेळाडू बनवते.