IPL 2022: दरवर्षी आयपीएल (IPL) खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी देते, तर काहीवेळा खेळाडू त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षांच्या दबावाखाली चिरडले जातात. संघ एखाद्या खेळाडूला मोठी रक्कम देऊन संघात सामील करतात परंतु ते सर्वच दबाव हाताळण्यात उत्तीर्ण होत नाहीत. या वर्षी देखील रोमारियो शेफर्ड, टिम डेविड (Tim David) आणि शिवम मावी (Shivam Mavi_) सारखे खेळाडू मैदानावर निराशाजनक कामगिरी करून त्यांना मिळालेल्या रकमेला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरले आहेत. यापैकी काहींना सुरुवातीच्या काही सामन्यात संधी मिळाली, तर अजून काही स्टार खेळाडू आहेत जे बेंचवर बसून मैदानातील खेळ पाहत आहेत. त्यांच्या खराब प्रदर्शनामुळे त्यांचा त्यांना संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधूनही बाहेरही काढले आहेत. आज आपण आयपीएल 2022 मधील पाच खेळाडूंवर नजर टाकूया जे त्यांना रकमेचे औचित्य सिद्ध करण्यात अयशस्वी ठरले आहेत. (IPL 2022: कमाईत हिरो, कामगिरीत झिरो! आयपीएलमधील महागड्या खेळाडूची बॅट अद्यापही थंडच; फटक्यांची प्रतिक्षा कायम)
रोमारियो शेफर्ड (Romario Shepherd)
सनरायझर्स हैदराबादने लिलावात त्याच्या अष्टपैलू क्षमतेच्या आधारे 7.75 कोटींत विकत घेतलेला वेस्ट इंडिजचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू शेफर्डने या वर्षी खेळलेल्या दोन सामन्यांमध्ये खराब कामगिरी केली. त्याने दोन सामन्यांमध्ये 32 धावा केल्या आणि आठ षटकात 75 धावा देऊन फक्त दोन विकेट्स घेतल्या. त्याच्या खराब प्रदर्शनामुळे दोन्ही सामन्यात SRH च्या पराभवामुळे संघ व्यवस्थापनाला त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर काढण्यास भाग पाडले.
शिवम मावी (Shivam Mavi)
23 वर्षीय मावीला गेल्या वर्षीच्या कामगिरीच्या जोरावर कोलकाताने 7.25 कोटींमध्ये पुन्हा लिलावात खरेदी केले. तथापि, 23 वर्षीय खेळाडू आयपीएल 2022 मध्ये लयीत दिसला नाही. त्याने या वर्षी फक्त दोन सामने खेळले पण दोन्ही सामन्यांमध्ये त्याने खूप धावा लुटल्या. त्याने कोलकाताकडून फक्त सहा षटके टाकली आणि 74 धावा दिल्या व एक विकेट घेतली.
टिम डेविड (Tim David)
टिम डेविड गेल्या दोन वर्षांपासून जगभरातील टी-20 लीगमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहे. आणि या वर्षी लिलावात त्याच्यासाठी मोठी लढाई पाहायला मिळाली आणि अखेरीस मुंबईने त्याला तब्बल 8.25 कोटींमध्ये खरेदी केले. तथापि, पीएसएलमध्ये जबरदस्त दिसलेला फलंदाज त्याची आयपीएलमध्ये पुनरावृत्ती करण्यात अयशस्वी ठरला. त्याने मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या दोन सामन्यांमध्ये केवळ 13 धावा केल्या. यामुळे मुंबईने आगामी सामन्यांसाठी बेंचवर बसवले.
एनरिच नॉर्टजे (Anrich Nortje)
लिलावापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज नॉर्टजेला दिल्ली कॅपिटल्सने 6.5 कोटींमध्ये रिटेन केले होते. मात्र त्याला दुखापत झाली होती आणि गेल्या तीन महिन्यांपासून तो मैदानाबाहेर होता. 100 टक्के नसूनही तो दिल्ली कॅपिटल्सच्या शिबिरात सामील झाला आणि लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध गेल्या आठवड्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवले. स्पीडस्टर, मात्र पूर्णपणे फ्लॉप ठरला आणि दोन बीमर टाकल्यामुळे त्याला बाहेर बसवले गळे. नॉर्टजेने 2.2 षटकात 35 धावा दिल्या.
शाहरुख खान (Shahrukh Khan)
देशांतर्गत सर्किटमध्ये वेळोवेळी आपले पॉवर हिटिंग कौशल्य दाखवलेल्या शाहरुख खानला पंजाब किंग्जने यावर्षीच्या लिलावात 9 कोटींमध्ये विकत घेतले होते. संघ व्यवस्थापनाने त्याला पाठिंबा दिला असून त्याला आतापर्यंत पाच संधी दिल्या आहेत, परंतु या वर्षी तो अद्याप फ्रँचायझीच्या विश्वासावर खरा उतरलेला नाही. पाच सामन्यांमध्ये, त्याने 120 च्या स्ट्राइक रेटने फक्त 60 धावा केल्या आहेत. जितेश शर्मा सारखे खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत आणि प्रभसिमरन सिंग आणि राज बावा सारखे तरुण बेंचवर बसले असताना शाहरुखचे संघातील स्थान निश्चित धोक्यात दिसत आहे.