IPL 2022: जेसन रॉय बाहेर पडल्यावर आता गुजरात टायटन्समध्ये होणार Suresh Raina याची एन्ट्री? इंग्लंड फलंदाजाच्या जागी नेटकऱ्यांमध्ये रैना होतोय ट्रेंड
इंग्लंडच्या जेसन रॉय याने बायो-बबल थकव्याचे कारण देत आगामी आयपीएल 15 मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. रॉयच्या जागी कोणत्या खेळाडूला बदली म्हणून सामील करावे असा प्रश्न फ्रँचायझी समोर असताना सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये भारतीय दिग्गज आणि ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैना याच्या नावाची चर्चा रंगली आहे.
IPL 2022: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15 व्या हंगामाची सुरुवात 26 मार्चपासून होणार आहे. पण त्यापूर्वी स्पर्धेत आपला पहिलाच सीजन खेळणाऱ्या हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाला जोरदार झटका बसला. इंग्लंडचा स्टार सलामी फलंदाज जेसन रॉय (Jason Roy) याने बायो-बबल थकव्याचे कारण देत आगामी आयपीएलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. गुजरातने गेल्या महिन्यात झालेल्या आयपीएल लिलावात (IPL Auction) रॉयला त्याच्या मूळ किमतीत, दोन कोटी रुपयात, खरेदी केले होते. आता रॉयच्या जागी कोणत्या खेळाडूला बदली म्हणून सामील करावे असा प्रश्न फ्रँचायझी समोर असताना सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये भारतीय दिग्गज आणि ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैना (Suresh Raina) याच्या नावाची चर्चा रंगली आहे. (IPL 2022: जेसन रॉय याने आयपीएलमधून पाय मागे खेचला, आता गुजरात टायटन्स ‘या’ 5 खेळाडूंचा पर्याय म्हणून विचार)
रैनाला चेन्नई सुपर किंग्जने रिलीज झाल्यानंतर आयपीएल 2022 लिलावात कोणत्याही फ्रँचायझीने खरेदी करण्यासाठी स्वारस्य दाखवले नाही, परंतु आता रैनाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो आयपीएलच्या या हंगामात पदार्पण करत असलेल्या गुजरात टायटन्स फ्रेंचायझीच्या जर्सीत दिसत आहे. त्यानंतर रैना आयपीएल 2022 मध्ये खेळणार आणि त्याला गुजरात टायटन्समध्ये स्थान मिळावे अशी विनंती चाहत्यांनी केली आहे. नुकतंच जेसन रॉय याची यावर्षीच्या स्पर्धेतून बाहेर पडल्याची बातमी समोर आल्यानंतर अचानक चाहते ट्विटरवर सक्रिय झाले. हे सर्व यूजर्स गुजरात टायटन्स फ्रँचायझीला रैनाचा संघात समावेश करण्याची विनंती करत आहेत. इंग्लिश खेळाडूच्या बदलीबाबत टायटन्सने अद्याप अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही.
सुरेश रैनाला निवडण्यासाठी वाईटातून चांगले घडले
रॉय OUT, रैना IN
त्याला परत आणा!
जेसन रॉयच्या जागी चिन्ना थाला
बायो बबलमध्ये दीर्घकाळ राहिल्यामुळे थकव्यामुळे इंग्लिश क्रिकेटपटूने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता अशा परिस्थितीत या फ्रँचायझी संघात सुरेश रैनाची एंट्री होणार का? असा मोठा प्रश्न चाहत्यांच्या मनात फिरत आहे. रॉय याने स्पर्धेपूर्वी नाव मागे घेतल्यानंतर सुरेश रैना पुन्हा एकदा प्रसिद्धी झोतात आला आहे. उल्लेखनीय आहे की स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात राजस्थान रॉयल्स आणि CSK वर 2 वर्षांची बंदी घालण्यात आली तेव्हा गुजरात लायन्स संघ दोन वर्षांसाठी या स्पर्धेत उतरला होता. आणि त्यावेळी सुरेश रैनाने गुजरात लायन्सचे नेतृत्व केले होते.