IPL 2022, SRH vs CSK: धोनी ब्रिगेडकडून हिशोब चुकता, चेन्नईचा हैदराबादवर 13 धावांनी दणदणीत विजय; ऋतुराज-कॉन्वेच्या वादळी खेळीनंतर मुकेश चौधरीने केली धुलाई
धोनी ब्रिगेडच्या या विजयात ऋतुराज गायकवाड, डेव्हन कॉन्वे आणि अखेरीस मुकेश चौधरीने महत्वपूर्ण भूमिका बजावली.
IPL 2022, SRH vs CSK: आयपीएलच्या (IPL) 15 व्या हंगामात दिग्गज एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात पहिला सामना खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) गेल्या सामन्यातील पराभवाचा हिशोब चुकता केला आणि सनरायझर्स हैदराबादवर (Sunrisers Hyderabad) 13 धावांनी दणदणीत विजय मिळवला. चेन्नईचा हा या हंगामातील तिसरा विजय ठार हैदराबाद संघाला चौथा पराभवाचा सामना करावा लागला असून संघाने सलग दुसरा सामना गमावला आहे. धोनी ब्रिगेडच्या या विजयात ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad), डेव्हन कॉन्वे आणि अखेरीस मुकेश चौधरीने (Mukesh Choudhary) महत्वपूर्ण भूमिका बजावली. ऋतुराजने सर्वाधिक 99 धाव चोपल्या तर कॉन्वे 85 धावा करून नाबाद परतला. तसेच चौधरी सर्वाधिक चार विकेट घेऊन सीएसकेचा यशस्वी गोलंदाज ठरला. त्याच्याशिवाय मिचेल सँटनर आणि ड्वेन प्रिटोरिया यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. (IPL 2022, SRH vs CSK: वेगाचा ‘मालिका’ Umran Malik, सनरायझर्स हैदराबाद हूकच्या एक्क्याने टाकला सर्वात वेगवान चेंडू, जाणून घ्या किती स्पीड)
चेन्नईने दिलेल्या भव्य धावसंख्येचा पाठलाग करताना हैदराबादने शानदार सुरुवात केली. कर्णधार विल्यमसन आणि अभिषेक शर्मा यांच्यात सलामीची 58 धावांची भागीदारी झाली. पण अभिषेक पाठोपाठ राहुल त्रिपाठीच्या विकेटने संघाला सुरुवातीलाच बॅकफूटवर ढकलले. यानंतर झटपट फलंदाजी करून एडन मार्करमही 17 धावा करून बाद झाला. मात्र विल्यमसन तग ठोकून संयमाने फलंदाज करत राहिला. तथापि अर्धशतकाच्या जवळ येऊन विल्यमसनला प्रिटोरियसने पायचीत पकडले. यामुळे संघ आणखी अडचणीत सापडला. अशा परिस्थितीत पूरन आणि शशांक सिंहच्या जोडीकडून संघाला मोठ्या अपेक्षा होत्या. पण मोक्याच्या क्षणी शशांक 15 आणि वॉशिंग्टन सुंदर 2 धावा करून एका पाठोपाठ तंबूत परतले. चौधरीच्या डावाच्या अंतिम षटकांत पूरने चौकार-षटकारांची आतषबाजी केली. निकोलस पूरन 64 धावांवर नाबाद परतला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने 202 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात हैदराबादला 20 षटके खेळून 6 गडी गमावून 189 धावा करता आल्या आणि सामना 13 धावांनी गमावला. आयपीएल 2022 मध्ये हैदराबादची सुरुवात खराब झाली आणि संघाने पहिले दोन सामने गमावले. तथापि संघाने सलग पाच सामने जिंकून सर्वांना चकित केले तरी आता सनरायझर्सला सलग दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे.