IPL 2022 Retention: लिलावापूर्वी मुंबई, CSK, दिल्ली घेणार मोठा निर्णय; ‘या’ स्टार भारतीय खेळाडूंना दाखवणार बाहेरचा रस्ता

कायम ठेवलेल्या खेळाडूंच्या घोषणेची तारीख जवळ येत असताना, एका अहवालात सुचवण्यात आले आहे की बहुतेक फ्रँचायझींनी त्यांच्या खेळाडूंच्या मुख्य गटाला अंतिम रूप दिले आहे, जे त्यांच्यासाठी पुढील हंगामात देखील खेळतील.

सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा (Photo Credit: PTI)

आयपीएल (IPL) फ्रँचायझी येत्या काही दिवसात रिटेन केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर करणार आहे. इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 आवृत्तीच्या मेगा लिलावापूर्वी (IPL Mega Auction) रिटेन्शन नियम जाहीर झाल्यापासून फ्रँचायझी गेल्या महिनाभरापासून कठोर परिश्रम करत आहेत. संघांना लिलावापूर्वी फक्त चार खेळाडूंना कायम ठेवण्याची परवानगी आहे, तर लखनौ आणि अहमदाबाद या दोन नवीन संघांना कायम न ठेवलेल्या खेळाडूंच्या पूलमधून प्रत्येकी तीन खेळाडू निवडता येतील. अनेक अहवालांनी सुचवले आहे की केएल राहुल पंजाब किंग्जला रामराम करण्याची शक्यता आहे, काही स्टार भारतीय खेळाडू एकतर दोन नवीन संघ ड्राफ्टमध्ये निवडले जातील किंवा थेट लिलावात उतरतील. अशा परिस्थितीत फ्रँचायझी स्टार कोणत्या भारतीय क्रिकेटपटूंना टाटा बाय करू शकते ते खालीलप्रमाणे आहेत. (IPL 2022 Mega Auction: कधी होणार आयपीएलचा मेगा लिलाव, रिटेन्शन नियमांपासून कोणत्या संघाकडे अधिक पैसे; जाणून घ्या)

1. केएल राहुल (KL Rahul)

गेल्या दोन हंगामातील पंजाब किंग्जच्या कर्णधाराला नवीन फ्रँचायझी मिळण्याची शक्यता आहे . राहुल किंग्जसाठी एक निश्चित कायम असणारा खेळाडू बनला असता कारण गेल्या चार वर्षांपासून तो एकमेव सातत्यपूर्ण कामगिरी करणारा आहे. त्याने 55 सामन्यांमध्ये 2500 हून अधिक धावा केल्या आहेत.

2. हार्दिक पांड्या (Hardik Pandya)

मुंबई इंडियन्सचा स्टार अष्टपैलू खेळाडूचेही नाव लिलावात येण्याची शक्यता आहे. हार्दिकचा फॉर्म आणि त्याचा फिटनेस यामुळे मुंबई इंडियन्स त्याच्यापासून वेगळे होण्यास सज्ज आहेत.

3. शिखर धवन (Shikhar Dhawan)

दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर 2019 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळल्यानंतर गेल्या तीन हंगामात जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. गेल्या तीन हंगामात कॅपिटल्सच्या शानदार प्रदर्शनाचे मुख्य कारण धवन आहे. परंतु त्याचे वय त्याच्या पलीकडे पाहण्याचे मुख्य कारण असेल कारण फ्रँचायझी पुढील तीन वर्षांसाठी एक संघ बांधणी करू पाहत असेल.

4. रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin)

आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्ससाठी गेल्या चार मोसमात केलेल्या कामगिरीच्या बळावर चार वर्षांनंतर व्हाईट-बॉल स्वरूपात भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या या चतुर ऑफ-स्पिनरही बहुधा लिलावात उतरेल. त्याने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर ही माहिती दिली आहे.

5. सुरेश रैना (Suresh Raina)

2020 च्या सीझनला मुकल्यानंतर रैना आयपीएलमध्ये परतला. त्याने अर्धशतक झळकावून धमाकेदार पुनरागमन केले परंतु हंगाम स्थगित होण्यापूर्वी त्याचा फॉर्म खराब झाला. दुसऱ्या सहामाहीत त्याला सीएसकेने वगळले ज्यामुळे तो निराश दिसला. CSK आता वेगळ्या दिशेने पाहू शकते आणि रैनाला लिलावात नवीन संघ मिळू शकतो.

6. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)

मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाने गेल्या चार वर्षांत आयपीएलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना खळबळ उडवून दिली होती. गेल्या चार वर्षांत संघाने दोन ट्रॉफी जिंकण्याचे तो एक मुख्य कारण होता. तथापि, आता एक कॅप्ड खेळाडू असल्याने आणि मुंबई इंडियन्सपुढे रोहित शर्मा व जसप्रीत बुमराह असे पर्याय असल्यामुळे यादववर पुढील तीन वर्षांसाठी नवीन फ्रँचायझी डाव लावू शकते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif